पणजी: फोंडा येथील गोवा बागायतदार सहकारी संस्थेतील कामगारांचा अनेक वर्षांपासून सुरू असलेला औद्योगिक वाद अखेर परस्पर संमतीने मिटला आहे. कामगार संघटना आणि व्यवस्थापन यांच्यात झालेल्या समझोत्याला औद्योगिक न्यायाधिकरणाने मान्यता दिली आहे.
न्यायाधिकरणाने दिलेल्या निवाड्यानुसार, १२ कामगारांना प्रत्येकी २ लाख ५० हजार रुपये देण्याचे ठरविण्यात आले आहे. तर अन्य चार कामगारांना प्रत्येकी ९० हजार रुपये देण्यात येणार आहेत.
गोमंतक मजदूर संघाच्या माध्यमातून या कामगारांचा वाद न्यायाधिकरणात मांडण्यात आला होता. संबंधित प्रकरण २००३ पासून प्रलंबित होते. या काळात कामगार आणि व्यवस्थापन यांच्यात विविध टप्प्यांवर चर्चा आणि न्यायालयीन प्रक्रिया सुरू होती.
समझोत्यानुसार, संबंधित १६ कामगारांना त्यांच्या दाव्यांच्या पूर्ण आणि अंतिम निपटाऱ्यासाठी निश्चित रक्कम देण्यात येणार आहे. प्रत्येक कामगाराला मिळणाऱ्या रकमेतून दहा टक्के रक्कम कापून ती गोमंतक मजदूर संघाला देण्याचेही ठरले आहे.
या प्रकरणातील चार महिला कामगारांना यापूर्वी न्यायाधिकरणाने प्रत्येकी २ लाख ८० हजार रुपये देण्याचे आदेश दिले होते. त्यासंबंधी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकाही मागे घेण्याचे दोन्ही बाजूंनी मान्य केले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.