Goa Food Poisoning Dainik Gomantak
गोवा

Goa Food Poisoning: बागा समुद्रकिनाऱ्यावर इडली-सांभार खाणं बेतलं जिवावर! केरळच्या 16 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु

Baga Beach Restaurant Incident: निसर्गरम्य समुद्रकिनारे आणि पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या गोव्यात एका धक्कादायक घटनेमुळे खळबळ उडाली.

Manish Jadhav

पणजी: निसर्गरम्य समुद्रकिनारे आणि पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या गोव्यात एका धक्कादायक घटनेमुळे खळबळ उडाली. सुट्टीचा आनंद घेण्यासाठी केरळहून गोव्यात आलेल्या 50 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या गटापैकी 16 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा (Food Poisoning) झाली. बागा समुद्रकिनाऱ्यावरील एका रेस्टॉरंटमध्ये 'इडली-सांभार' खाल्ल्यानंतर या विद्यार्थ्यांना उलट्या आणि मळमळीचा त्रास सुरु झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, केरळमधील एका महाविद्यालयाचे सुमारे 50 विद्यार्थी सुट्टीसाठी गोव्यात आले होते. फिरत असताना बागा समुद्रकिनाऱ्यावरील एका स्थानिक रेस्टॉरंटमध्ये या विद्यार्थ्यांनी नाश्ता केला. यावेळी बहुतांश विद्यार्थ्यांनी इडली-सांभारची ऑर्डर दिली होती. नाश्ता केल्यानंतर काही वेळातच 16 विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली. त्यांना सतत उलट्या होऊ लागल्या आणि अशक्तपणा जाणवू लागला. विद्यार्थ्यांची प्रकृती खालावल्याचे लक्षात येताच इतर सहकाऱ्यांनी आणि स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. या 16 विद्यार्थ्यांना तातडीने उत्तर गोवा (Goa) जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

आरोग्य यंत्रणा सतर्क

रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांवर सध्या उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. अन्नातून विषबाधा झाल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात असून अन्नाचे नमुने तपासणीसाठी घेतले जाण्याची शक्यता आहे. या घटनेमुळे बागा समुद्रकिनाऱ्यावरील खाद्यपदार्थांच्या दर्जावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. गोव्याच्या किनारपट्टी भागात पर्यटकांची मोठी गर्दी असते, अशावेळी हॉटेल आणि रेस्टॉरंटमधील अन्नाच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष होणे पर्यटकांच्या जिवावर बेतू शकते. पोलीस आणि अन्न व औषध प्रशासन या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Cricket: आर्यन नार्वेकरची कर्णधाराला साजेशी खेळी! गोव्याची बडोद्याविरुद्ध 4 बाद 227 धावांपर्यंत मजल

Ranji Trophy: गोव्याची गोलंदाजी पुन्हा निष्प्रभ! बडोद्याचा 472 धावांचा डोंगर; अतीत शेठचे शतक एका धावेने हुकले

Shocking Video: नशेविरोधात लढणाऱ्या माजी कबड्डीपटूची दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या, खळबळजनक व्हिडिओ व्हायरल; मेडिकल स्टोरमध्ये घडला रक्तरंजित थरार

Porvorim Sewage Treatment Plant: पर्वरीचा सांडपाणी प्रकल्प 93 टक्के पूर्ण; डिसेंबर 2026 पर्यंत सुरू होण्याचे लक्ष्य

Mormugao Raja Shed Demolition: 'मुरगावचा राजा' शेडचे पाडकाम पूर्ण! अधिकाऱ्यांवरील हल्ल्याने हायकोर्ट संतप्त

SCROLL FOR NEXT