Goa Crime: चोरीसाठी महिलेच्या जिवावर उठला चोर! थरारक घटनेनंतर मडगाव पोलिसांची मोठी कारवाई; संशयिताच्या आवळल्या मुसक्या

Margao Comba Robbery: मडगावातील कोंब परिसरात चोरीची घटना घडली. चोरीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या अज्ञात आरोपीने घरमालक महिलेवर धारदार कटरने हल्ला करुन तिला जखमी केले.
Goa News arrested
arrested Dainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: मडगावातील कोंब परिसरात चोरीची घटना घडली. चोरीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या अज्ञात आरोपीने घरमालक महिलेवर धारदार कटरने हल्ला करुन तिला जखमी केले आणि लॅपटॉपसह मोबाईल फोन घेऊन पळ काढला. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले. मात्र मडगाव पोलिसांनी वेगाने तपास चक्रे फिरवत एका संशयिताच्या मुसक्या आवळल्या.

मध्यरात्रीचा थरार

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना शुक्रवारी (16 जानेवारी) मध्यरात्रीच्या सुमारास घडली. अज्ञात आरोपीने कोंब येथील एका घरात चोरी करण्याच्या हेतूने प्रवेश केला. घरातील लोक झोपेत असताना आरोपी मौल्यवान वस्तूंचा शोध घेत होता. मात्र, घराच्या मालकीण असलेल्या महिलेला घरामध्ये कोणीतरी असल्याची चाहूल लागली आणि त्या जाग्या झाल्या. महिलेने प्रसंगावधान राखून आरोपीला अडवण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने आपल्याकडे असलेल्या धारदार कटरने महिलेवर सपासप वार केले. या हल्ल्यात महिला जखमी झाली. महिलेला जखमी अवस्थेत सोडून आरोपीने घरातील लॅपटॉप आणि मोबाईल फोन हिसकावून घटनास्थळावरुन पळ काढला. सुदैवाने या हल्ल्यात महिलेचा जीव वाचला असून त्या आता सुरक्षित आहेत.

Goa News arrested
Goa Crime: "बारावीच्या परीक्षेत बसू दिले जाणार नाही" शाळेच्या निर्णयामुळे विद्यार्थिनीनं गळफास घेत संपवलं जीवन

मडगाव पोलिसांची तत्परता: संशयित ताब्यात

घटनेची माहिती मिळताच मडगाव पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. मडगाव पोलीस निरीक्षक (PI) सूरज सामंत यांनी स्वतः या प्रकरणाची दखल घेतली. जखमी महिलेला तातडीने प्रथमोपचार देण्यात आले. पोलिसांनी या घटनेचा गांभीर्याने तपास सुरु केला आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपीचा माग काढण्यास सुरुवात केली.

शुक्रवारी सकाळी मडगाव पोलिसांनी रेल्वे स्थानक परिसरातून एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले. हाच तो कटरने हल्ला करणारा आरोपी आहे का, याची पोलीस कसून चौकशी करत आहेत. "आम्ही एका संशयिताला रेल्वे स्थानकावरुन ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरु आहे. जखमी महिला आता सुरक्षित आहे," अशी माहिती पीआय सूरज सामंत यांनी दिली.

Goa News arrested
Goa Crime: कार आडवी घातली, आरसा तोडला! म्हापशात कारचालकाचा गोंधळ; रोडरेज प्रकरणी गुन्हा दाखल

परिसरात भीतीचे सावट

मडगावसारख्या (Margao) गजबजलेल्या शहरात अशा प्रकारे घरात घुसून महिलेवर जीवघेणा हल्ला झाल्यामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वाढत्या चोऱ्यांच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी कोंब येथील नागरिकांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com