Bhutani Infra Project In Goa  Dainik Gomantak
गोवा

Bhutani Project: ‘भूतानी’चे सर्व परवाने रद्द करावेत! पर्यावरण दाखला नसल्याचा 'गोवा बचाव'चा आरोप

Bhutani Infra Project Sancoale: सांकवाळ येथील प्रकल्पाला पर्यावरण दाखला आवश्यक असताना तो घेतला गेला नसल्याचा आरोप गोवा बचाव अभियानने केला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Bhutani Infra Project Sancoale

पणजी: सांकवाळ येथील प्रकल्पाला पर्यावरण दाखला आवश्यक असताना तो घेतला गेला नसल्याचा आरोप गोवा बचाव अभियानने केला आहे.

नियमानुसार २० हजार चौरस मीटरपेक्षा जास्त आकाराच्या प्रकल्पांसाठी पर्यावरणीय मंजुरी आवश्यक असते. असे असताना ८५ हजार ८८६ चौरस मीटर क्षेत्रातील प्रकल्पासाठी आवश्यक असतानाही पर्यावरणीय मंजुरी घेण्यात आली नसल्याकडे गोवा बचाव अभियानच्या निमंत्रक सबिना मार्टिन्स व सचिव रेबोनी सहा यांनी लक्ष वेधले आहे.

त्यांनी म्हटले आहे की, शासकीय भूगोल नकाशे दर्शवितात की प्रकल्पाच्या जागेवरील उतार अनुमत मर्यादेपलीकडे आहेत. टॉपोग्राफिकल नकाशांचे उल्लंघन करून डोंगर कापणीसाठी आवश्यक १७ अ अंतर्गत परवानगी न घेता मंजुरी मिळाली आहे. प्रकल्पाला २०० चटई निर्देशांकासह वाणिज्य १ विभाग प्रमाणपत्र दिले गेले, ज्याची परवानगी फक्त ‘सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट’मध्ये दिली जाते; परंतु या प्रकल्पाला ती मंजुरी कशी दिली गेली, हा मोठा प्रश्न आहे.

एवढ्या मोठ्या प्रकल्पासाठी योग्य रस्ता प्रवेश नसणे, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. या खास सर्व्हे क्रमांक २५७/१ वरच खासगी जंगल चिन्हांकन रद्द करण्यात आले आहे.

सर्व परवाने रद्द करावेत

१. मार्टिन्स आणि सहा यांनी म्हटले की, सांकवाळमध्ये एक एकराहून अधिक क्षेत्र तलावांनी व्यापलेल्या जमिनीच्या भू-रूपांतरास परवानगी देणे हे पाण्याच्या ताण असलेल्या गावात जीवनाच्या रक्षक नौकेत छिद्र पाडण्यासारखे आहे. गैरसमजुतींवर आधारलेले सर्व परवाने रद्द करावेत.

२. मुरगाव नियोजन व विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षांनी तांत्रिक परवानगी मागे घ्यावी आणि पंचायत संचालकांनी पंयायतीमार्फत मंजूर केलेल्या परवानग्या रद्द कराव्यात. मुख्यमंत्र्यांनी गप्प बसू नये, जनतेच्या आवाजाला प्रतिसाद देऊन गोव्यातील जनतेला न्यायाची बाजू दर्शवावी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

US China Trade: डोनाल्ड ट्रम्प, जिनपिंग यांच्यात होणार मिटिंग? आयातशुल्क निर्णय 90 दिवस लांबणीवर; वाद टळला

Goa Film Industry: सरकारला फक्त ‘इव्हेन्ट’ हवेत, गोव्यात चित्रपट तरावा, अशी इच्छा नाही..

Horoscope: नोकरीचा शोध आता संपणार, कुंभसोबत 'या 2' राशींचं नशीब उजळणार

Narve Masandevi Jatra: 100 हून अधिक वर्षांचा इतिहास असणारी, दिवसाच भरणारी नार्वेतील 'मसणदेवीची जत्रा'; Watch Video

Elon Musk: ‘ॲपल’वरती मस्क चिडले! ‘ॲप’ची शिफारस न केल्याप्रकरणी दाखल करणार दावा; Xवर व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT