Bhutani Project: 'परवाने रद्द होत नाहीत तोपर्यंत उपोषण सुरूच'; तब्येत बिघडली तरी 'भूतानी'विरुद्ध नाईक ठाम

Bhutani Infra Project Sancoale: सांकवाळ पंचायतीचे माजी सरपंच तथा ज्येष्ठ नागरिक प्रेमानंद पुरुषोत्तम नाईक यांनी भूतानी इन्फ्रा प्रकल्पाच्या विरोधात आमरण उपोषण सुरूच ठेवले आहे. नाईक यांच्या उपोषणालासहा दिवस पूर्ण झाले, तरी सरकार अजूनही भूतानी इन्फ्रा प्रकल्पाच्या विरोधात गंभीर नसल्याचे स्पष्ट दिसत आहे.
Bhutani Infra Project Sancoale: सांकवाळ पंचायतीचे माजी सरपंच तथा ज्येष्ठ नागरिक प्रेमानंद पुरुषोत्तम नाईक यांनी भूतानी इन्फ्रा प्रकल्पाच्या विरोधात आमरण उपोषण सुरूच ठेवले आहे. नाईक यांच्या उपोषणालासहा दिवस पूर्ण झाले, तरी सरकार अजूनही भूतानी इन्फ्रा प्रकल्पाच्या विरोधात गंभीर नसल्याचे स्पष्ट दिसत आहे.
Premanand Naik Protest Against Bhutani Infra Project Sancoale Dainik Gomantak
Published on
Updated on

Preamanand Naiks Protest Against Bhutani Infra Project Sancoale

वास्को: सांकवाळ पंचायतीचे माजी सरपंच तथा ज्येष्ठ नागरिक प्रेमानंद पुरुषोत्तम नाईक यांनी भूतानी इन्फ्रा प्रकल्पाच्या विरोधात आमरण उपोषण सुरूच ठेवले आहे. नाईक यांच्या उपोषणाला शनिवारी सहा दिवस पूर्ण झाले, तरी सरकार अजूनही भूतानी इन्फ्रा प्रकल्पाच्या विरोधात गंभीर नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात येणारी दीपावली नाईक कुटुंबाला सांकवाळ पंचायतीसमोरच साजरी करावी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

कुठ्ठाळीचे आमदार आंतोन वाझ, दक्षिण गोवा खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस व इतरांनी प्रेमानंद नाईक यांची खालावलेली तब्येत पाहून उपोषण मागे घेण्याची मागणी केली होती, परंतु जोपर्यंत भूतानी इन्फ्रा प्रकल्पाला दिलेले परवाने सांकवाळ पंचायत व इतर विभाग रद्द करत नाही, तोपर्यंत माझे उपोषण सुरूच राहणार असल्याचे नाईक यांनी सांगितले.

अनेक सामाजिक कार्यकर्त्यांबरोबरच आज कॅन काब्राल यांनी प्रेमानंद यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला. यावेळी ते म्हणाले, की सर्वप्रथम येथे नेमण्यात आलेल्या सचिव ओरविल वालिस यांना कामावरून बडतर्फ करणे आवश्यक आहे. त्यांचे शिक्षण सचिवपदाचे नसून त्यांना पदावरून काढणे गरजेचे आहे.

सचिवपदी पदवी प्राप्त शिक्षण असणे आवश्यक आहे, परंतु ओरविल वालिस यांचे शिक्षण फक्त उच्च माध्यमिकपर्यंतचे आहे. त्यांची नेमणूक फक्त बेकायदेशीर प्रकल्पांना मान्यता देण्यासाठी केली आहे. ग्रामसेवक कधी पंचायतीचा सचिव होऊ शकत नाही. पंचायत राज्यघटनेत याला मान्यता नसून यात मोठा भ्रष्टाचार झाल्याची माहिती काब्राल यांनी दिली.

अनेकांचा पाठिंबा

उपोषणाला बसलेल्या प्रेमानंद नाईक यांना पाठिंबा देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर, शंकर पोळजी, तारा केरकर, पिटर डिसोझा, प्रतिमा कुतिन्हो, संजय बर्डे, बायंगिणी-जुने गोवे येथील सेंट पेद्रो चर्चचे फादर कॉनेलो ब्रिटो फर्नांडिस, सामाजिक कार्यकर्ते कॅन काब्राल व तेथील रहिवासी आज मोठ्या संख्येने आले होते.

डॉक्टरांकडून तपासणी

सांकवाळ पंचायतीसमोर आमरण उपोषणाला बसलेले माजी सरपंच प्रेमानंद नाईक यांची तब्येत सहाव्या दिवशीही खालावल्याने कुठ्ठाळी आरोग्य केंद्राच्या डॉक्टरांनी येऊन त्यांची तपासणी केली.

‘पंचायत सचिवाला मंत्र्यांचा पाठिंबा’

कुठ्ठाळी - सांकवाळ पंचायत क्षेत्रातील सावळफोंड गावात भूतानी इन्फ्रातर्फे मोठा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. हा प्रकल्प आल्यास त्याचा परिणाम संपूर्ण मुरगाव तालुक्याला होणार असल्याची माहिती सांकवाळचे पंच तथा दक्षिण गोवा भाजप अध्यक्ष तुळशीदास नाईक यांनी दिली. सांकवाळ पंचायतीच्या सत्ताधारी पंच सदस्यांबरोबर ग्रामसेवक म्हणून नेमणूक करण्यात आलेले सचिव ओरविल वालिस यांनी बेकायदेशीरपणे भूतानी इन्फ्रा प्रकल्प उभारण्यासाठी परवानगी दिली आहे. यात त्यांना एका मंत्र्यांचा पाठिंबा असल्याची माहिती पंच नाईक यांनी दिली.

Bhutani Infra Project Sancoale: सांकवाळ पंचायतीचे माजी सरपंच तथा ज्येष्ठ नागरिक प्रेमानंद पुरुषोत्तम नाईक यांनी भूतानी इन्फ्रा प्रकल्पाच्या विरोधात आमरण उपोषण सुरूच ठेवले आहे. नाईक यांच्या उपोषणालासहा दिवस पूर्ण झाले, तरी सरकार अजूनही भूतानी इन्फ्रा प्रकल्पाच्या विरोधात गंभीर नसल्याचे स्पष्ट दिसत आहे.
Goa Drugs Case: पोलिसांच्या सापळ्यात अडकला ड्रग्ज विक्रेता! साडेसहा लाखांचे चरस हस्तगत; झारखंडच्या तरुणास अटक

मॉविन गुदिन्होंबद्दल नाईक कुटुंबीय नाराज

एकेकाळी प्रेमानंद नाईक पंच असताना मॉविन गुदिन्हो यांचे ते खंदे समर्थक होते. आज प्रेमानंद नाईक सांकवाळ गाव वाचविण्यासाठी अनेक दिवसांपासून उपोषणाला बसले असून पंचायतमंत्री मॉविन गुदिन्हो यांनी त्यांची साधी विचारपूससुद्धा केली नसल्याने नाईक कुटुंबाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसेच जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत मी माझे उपोषण चालूच ठेवणार, असे प्रेमानंद नाईक यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com