प्रतीकात्मक छायाचित्र
प्रतीकात्मक छायाचित्र  Dainik Gomantak
गोवा

अत्याचारानंतर ‘तिचा’ आत्महत्येचा प्रयत्न

Dainik Gomantak

Goa: सध्या सगळीकडे सणासुदीचे वातावरण असताना पणजीपासून आठ किलोमीटरवर अंतरावरील बिठ्ठोण येथे धक्कादायक घटना घडली. सिद्धी नाईक मृत्यू प्रकरण ताजे असतानाच पुन्हा नव्याने मुलीचे अपहरण करून लैंगिक अत्याचाराच्या (Sexual harassment) प्रकरणाने राज्य हादरले आहे. या पीडित मुलीने आत्महत्येचा प्रयत्न (Attempted suicide) केल्यामुळे प्रकरणाने गंभीर वळण घेतले असून या घटनेनंतर सरकारच्या कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण होत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 3 नोव्हेंबर म्हणजे दिवाळीच्या आदल्या दिवशी सकाळी 9.45 ते दुपारी 2 यादरम्यान ही माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली. याप्रकरणी पीडित 16 वर्षीय मुलीच्या मोठ्या भावाने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. आज रविवारी त्याला न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक प्रतीक भट यांनी दिली. पोलिसांनी भादंसंच्या 354, 354 अ, 363, 342, 376, गोवा बाल कायदा कलम 8(2), पोक्सो कायदा कलम 4 आणि 8 खाली गुन्हा नोंद केला. याप्रकरणी पुढील तपास पर्वरी पोलिस करीत आहेत.

दुमजली इमारतीवरून आत्महत्येचा प्रयत्न

या घटनेचे वर्णन अंगावर शहारे आणणार आहे. प्रथम संशयित आरोपीने या अल्पवयीन युवतीला आपल्या कारमध्ये कोंबले आणि जबरदस्तीने तिचे अपहरण केले. नंतर तिला वेरे येथे नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या घटनेनंतर पीडित मुलीने आत्महत्या करण्याच्या हेतूने दुमजली इमारतीवरून उडी मारली. या प्रकारात तिच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली. तिच्यावर बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या इस्पितळात उपचार सुरू आहेत.

ओळखीचा फायदा घेऊन कुकृत्य

पीडित मुलगी संशयिताच्या शेजारीच राहाते. संशयिताने या मुलीशी असलेल्या ओळखीचा फायदा घेऊन तिच्यावर अत्याचार केला असल्याचे स्पष्ट होत आहे. संशयित विवाहित असून त्याला दोन मुले आहेत. अल्पवयीन युवतीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली पर्वरी पोलिसांनी शनिवारी दुपारी दीडच्या सुमारास जावेद शेख उर्फ कबीर (31, रा. हाळीवाडा, पेन्ह द फ्रान्स) या संशयितास अटक केली आहे.

पर्वरी येथे एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून बलात्कार करण्याची घटना तसेच पीडित मुलीने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, हे ऐकून मी नखशिखांत हादरलो. राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी त्वरित हस्तक्षेप करून जनतेच्या सुरक्षिततेसाठी पाऊले उचलणे गरजेचे आहे. या निष्पाप मुलीच्या आरोग्यासाठी आणि आयुष्यासाठी मी प्रार्थना करतो. सरकारने तिला उत्तम आरोग्य सेवा देणे गरजेचे आहे.

- दिगंबर कामत, विरोधी पक्षनेते

‘‘भाऊबिजेच्या दिवशीच एका बहिणीचे रक्षण करण्यात असंवेदनशील भाजप सरकारच्या मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना पूर्णत: अपयश आले आहे. मी राज्यपाल पी.एस. श्रीधरन पिल्लई यांना विनंती करते की, हे संवेदनाहीन सरकार लवकर बरखास्त करावे.

- बीना नाईक, अध्यक्ष, महिला काँग्रेस

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nuvem Accident : नुवेत कारच्या धडकेने दुचाकीस्‍वाराचा मृत्यू

Tiswadi Agriculture : नेवरा खाजन शेतजमिनीत पुन्हा नदीचे खारे पाणी; शेतीला चालना देण्याचे पोकळ दावे

आपण नागरिक म्हणून मतदान करणार का ?

शिरगावच्या जत्रेत प्रगटलेली क्रांतिज्योत

बारावंश

SCROLL FOR NEXT