पश्चिम बगल रस्त्यावर मातीचे भराव टाकणे पुन्हा सुरू

सुमारे 50 ट्रक मातीचा भराव या ठिकाणी घालण्यात आला
सुरावली ते मुंगूल रस्त्याच्या बांधकामासाठी मातीचा भराव टाकताना ट्रक
सुरावली ते मुंगूल रस्त्याच्या बांधकामासाठी मातीचा भराव टाकताना ट्रक Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa: सुरावली ते मुंगूल या अडीज किलोमीटर अंतराचे पश्चिम बगल रस्त्याचे काम निवडणुकीपर्यंत (Goa Election 2022) बंद राहणार, असे स्थानिक आमदार चर्चिल आलेमाव (MLA Churchill Alemao) यांनी सांगितले असले तरी आज या ठिकाणी मातीचे भराव टाकण्यास सुरवात केल्याने स्थानिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

सुरावली ते मुंगूल रस्त्याच्या बांधकामासाठी मातीचा भराव टाकताना ट्रक
पत्नीचा खून करण्यासाठी वापरलेला चाकू जप्त

आज सुमारे 50 ट्रक मातीचा भराव या ठिकाणी घालण्यात आला. शनिवारचा मुहूर्त साधून हे काम सुरू केल्याने यात काहीतरी काळेबेरे असावे असा संशय हा मार्ग मातीचा भराव घालून उभारण्यास विरोध करणाऱ्या पर्यावरण कार्यकर्त्या रॉयला फर्नांडिस (Royla Fernandez) यांनी व्यक्त केला असून शनिवारी आणि रविवारी मिळून हे काम पूर्ण करण्याचे सरकारचे हे कारस्थान असल्याचा संशय फर्नांडिस यांनी व्यक्त केला.

शनिवारी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता ओळीने या ठिकाणी ट्रक पार्क करून ठेवल्याचे दिसून आले. या ट्रकात भरून आणलेली काळसर माती या ठिकाणी खाली केली जात होती. सदर रस्ता मातीचा भराव घालून बांधावा की स्टिल्टवर पूल उभारून यावर निर्णय घेण्यासाठी 10 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय हरित लवादा समोर सुनावणी होणार असताना त्यापूर्वी हे काम हातात घेतल्याने फर्नांडिस यांनी आश्चर्य व्यक्त केले. राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशाचा हा उपमर्द असल्याची टीका त्यांनी केली.

सुरावली ते मुंगूल रस्त्याच्या बांधकामासाठी मातीचा भराव टाकताना ट्रक
पर्यटन हंगामातील पहिले चार्टर विमान डिसेंबरमध्ये गोव्यात उतरणार

हा अडीज किलोमीटरचा पट्टा पाणथळ जागा असून जैवसंपदेच्या दृष्टीनेही ही जागा संवेदनशील क्षेत्र असल्याने या जागेत मातीचा भराव टाकून रस्ता न उभारता पुलावर हा रस्ता बांधावा अशी मागणी करणारी याचिका फर्नांडिस यांनी हरित लवादाकडे दाखल केली होती. त्यावर लवादाने हे प्रकरण राज्य सरकारकडे पुन्हा पाठवत तज्ज्ञांच्या समितीकडून फर्नांडिस यांनी घेतलेल्या आक्षेपावर अभ्यास करून त्याचा अंतिम अहवाल लवादासमोर सादर करावा, असा आदेश दिला होता. यावर आता 10 नोव्हेंबरला सुनावणी आहे.

यापूर्वी चर्चिल आलेमाव यांनी या जागेवर सामान ठेवण्यास आणि कामगारांची राहण्याची सोय करण्यासाठी कॅम्प बांधला जाणार असल्याचे सांगितले होते. यावर बोलताना रॉयला फर्नांडिस यांनी येथे कॅम्प उभारला जात असेल तर तो किती लोकांसाठी हे स्पष्ट झाले पाहिजे असे म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com