Goa ATS Officer Bribery Case Dainik Gomantak
गोवा

ATS Officer Bribery Case : खंडणीवसुली प्रकरणातील ‘त्या’ एटीएस पोलिसांची त्रेधा

आठवडा उलटूनही चौकशी गुलदस्त्यातच

दैनिक गोमन्तक डिजिटल

ATS Officer Bribery Case : खंडणी वसुली प्रकरणातील एटीएसच्या पाच पोलिसांची रवानगी वाळपई पोलिस प्रशिक्षण केंद्रात झाली असली तरी त्यांनी ड्युटीवर हजेरी लावलेली नाही. ते आजारी रजेवर आहेत. हे प्रकरण दडपण्यासाठी त्यांनी काही मंत्री व आमदारांकडे धावाधाव सुरू केली असून त्यांची त्रेधा उडाली आहे.

पोलिस महासंचालकांनी प्राथमिक चौकशी सुरू केली, मात्र चौकशीसाठी कोणीही अजूनही समोर आलेले नाहीत. राजकारण्यांकडून येणाऱ्या दडपणालाही चौकशी अधिकारी कंटाळलेले आहेत. आठवडा उलटला तरी या पोलिसांवर कारवाई झालेली नाही.

हे खंडणीवसुली प्रकरण राज्यात उघड झाल्यानंतर बरीच खळबळ माजली होती. या प्रकरणाशी संबंधित असलेले पाच पोलिस कर्मचारी तसेच एक वरिष्ठ अधिकारी रजेवर गेले होते. मात्र, त्यापैकी कोणीही अजून रूजू झाला नाही.

रजेवर असताना त्याला चौकशी अधिकाऱ्यांनी ईमेलद्वारे बोलावणे पाठवले होते. मात्र, तो आला नव्हता. एटीएस पोलिसांवरील टांगती तलवार असल्याने या पथकातील इतर पोलिसांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

यापूर्वी पोलिस खात्यातील काही पोलिसांवर खंडणीवसुलीचे आरोप झाल्यास त्याच्यावर कारवाई होत असे. त्यांची राखीव पोलिस दलात बदली केली जाते किंवा त्याला निलंबित करण्याचे प्रकार आधी घडले आहेत, मात्र या प्रकरणात काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचेच लागेबांधे असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही दडपण आले आहे. परिणामी पोलिसांची बदनामी झाली आहे.

पोलिस रजेवर

सदर खंडणीवसुलीप्रकरणी चौकशी अधिकाऱ्यांनी ई-मेलद्वारे संबंधित पोलिसांना समन्स बजावला होता. मात्र, संबंधित पोलिस अधिकारी आजारी रजेवर गेला आहे.

काही राजकीय नेत्यांच्या वा मंत्री तसेच आमदारांच्या गाठीभेटीही या प्रकरणातून सुटकेसाठी घेत असल्याचे तसेच कुणीही रूजू झाले नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

पोलिस, गुन्हेगारांत फरक काय ?

पोलिस खात्यात भ्रष्टाचार आहे हे सर्वश्रुत आहे, मात्र मोकळपणाने जाऊन खंडणीवसुलीची पद्धत गुन्हेगारांप्रमाणे आहे. त्यामुळे पोलिस व गुन्हेगारांत फरक काय राहिला, असा संतप्त सवाल एका वरिष्ठ अधिकाऱ्याने विचारला.

अशा या भ्रष्ट पोलिस कर्मचाऱ्यांना पोलिस सेवेत राहण्याचा हक्क नाही. जोपर्यंत कडक कारवाई होत नाही, शिस्तबद्ध समजले जाणारे पोलिस दलही बेशिस्तच मानले जाईल. राजकारण्यांच्या हस्तक्षेपामुळे या पोलिसांचे चांगलेच फावले आहे.

काही पोलिस हे राजकारण्यांसाठीच काम करतात का, असाही प्रश्‍न उपस्थित होतो. एटीएस पोलिस हे दशहतवाद्यांना रोखण्यासाठी व त्यांच्यावर पाळत ठेवण्यासाठी असतात, जर तेच असे वागू लागले तरी पोलिस सुरक्षा डळमळीत होण्यास वेळ लागणार नाही, असेही हा अधिकारी म्हणाला.

पोलिसांची प्रतिमा सुधारावी

पोलिस प्रशासन हे जनतेच्या सुरक्षेसाठी तैनात असते. समाजापुढे पोलिसांनीच आपली प्रतिमा स्वच्छ ठेवून आदर्श ठेवला पाहिजे. सुरक्षा पुरवणारे पोलिस दलच जर भ्रष्टाचाराच्या दलदलीत अडकले तर समाजाने पहावे कुणाकडे असा प्रश्‍न सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे.

समाजासमोर आदर्श ठेवण्यासाठी पोलिस प्रशासनाने आपली छबी सुधारण्याची गरज आहे,असे मतही काहींनी व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Origin of Goans: 6000 ईसापूर्व भारतीय पुरुषांचे इराणमध्ये स्थलांतर झाले; गोमंतकीयांच्या मूलस्थानाचा शोध

फोन देण्यासाठी दार उघडले, समोर दिसला मृतदेह; सॉफ्टवेअर अभियंत्याचा हणजूण हॉटेलमध्ये रहस्यमय मृत्यू

Goa Live News: 8 दिवसांत रस्त्याची दुरुस्ती न केल्यास खड्ड्यात 200 काजुची रोपे लावण्याचा ग्रामस्थाचा इशारा

Goan Architecture: ‘नीज-गोंयकारांनो’ जागे व्हा! लादलेल्या प्रोजेक्ट्समुळे पारंपरिक स्थापत्यकलेचा ‘सत्यानाश’ होतोय

Shivaji Maharaj: अफझल खान मारला गेला, त्याचा मुलगा फाजल कराडच्या मशिदीच्या मिनारांमध्ये लपला; प्रतापगडची लढाई

SCROLL FOR NEXT