Mapusa: पालिकेच्या कारणे दाखवा नोटीसचा निषेध, दुकाने बंद करून दुकानदार रस्त्यावर

दुकानदारांच्या हितासाठी तातडीने ऑर्डीनियन्स काढावा अशी मागणी केलीय.
Mapusa
Mapusa Dainik Gomantak

भाडेकरु करारपत्र नूतनीकरण विषयसंदर्भात म्हापसा पालिकेने काही दुकानदारांनी दुकाने परस्पररित्या तिसर्‍या व्यक्तीस भाडेपट्ट्याने दिल्ल्याबद्दल संबंधित या दुकान व स्टॉल्सच्या मूळ 309 भाडेकरुंना कारणे दाखवा नोटीस बजावल्या आहेत.

आज म्हापसा मार्केटमधील दुकानदारांनी नोटीसीचा निषेध केला. तसेच, दुकानदारांच्या हितासाठी तातडीने ऑर्डीनियन्स काढावा अशी मागणी केली.

Mapusa
Mapusa Dainik Gomantak

म्हापसा पालिकेच्या कारणे दाखवा नोटीसीच्या कारवाई निषेधार्थ दुकानदार रस्त्यावर उतरले, मार्केटमधील दुकानेही बंद केली. दुकानदारांच्या हितार्थ ऑर्डीनियन्स कढावा अशी मागणी व्यापारी संघटनेने केली आहे.

दरम्यान, मुख्याधिकारी अमितेश शिरवईकर यांनी जारी केलेल्या या नोटिसीमध्ये मूळ भाडेधारकांना दुकाने, स्टॉल्स, गाळेवजा व इतर आस्थापनांची भाडेपट्टी (एक तर वैध/कालबाह्य) का मानली जाऊ नये, याचे कारण दाखवण्यासाठी सात दिवसांच्या आत लेखी उत्तर देण्यास सांगितले आहे. 

Mapusa
गोवा सरकारची घोडचूक; 98 सरकारी विभागाचे लॉगिन आयडी आणि पासवर्ड केले सार्वजनिक

उपलब्ध माहितीनुसार, म्हापसा नगरपालिकेने काही काळापूर्वी सर्व पालिका दुकाने व स्टॉल्सचे सर्वेक्षण केले होते. कारण पालिका संचालकांनी पालिकेच्या स्थावर मालमत्तेतील सध्याच्या व्यापाऱ्यांचे (भोगवटादार) तपशील सादर करण्यास सांगितले होते. त्यानुसार सध्या व्यापलेली दुकाने, गाळेवजा व इतर आस्थापनांची ओळख पटविण्यासाठी तपशिलांची पडताळणी करून माहिती गोळा करण्यात आली होती. त्यानंतर पालिकेने मूळ भाडेकरूंना कारणे दाखवा नोटीस जारी करण्याची प्रक्रिया सुरू केली, ज्यांनी कथितरित्या सदर मालमत्ता परस्पर तिसऱ्याला भाडेपट्टीवर दिली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com