Lok Sabha Elections 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी उत्तरेत भाजपचे काम सुरू

संपर्क प्रमुखांच्या माध्यमातून कानोसा घेण्यास सुरुवात
127 Constitution Amendment Bill introduced in Lok Sabha)
127 Constitution Amendment Bill introduced in Lok Sabha)Dainik Gomantak

Lok Sabha Elections 2024 : लोकसभेच्या 2024च्या निवडणुकासाठी भाजप कामाला लागली आहे. उत्तरेत बुथ स्तरावर कसे काम चालू आहे, उमेदवारी कोणाला द्यावी यासाठी संपर्क प्रमुखांच्या माध्यमातून कानोसा घेतला जाऊ लागला आहे.

सध्याच्या खासदारांचे काम आणि नव्या उमेदवारांच्या नावांवरही मते जाणून घेतली जात असल्याची माहिती समोर आली आहे. मागील लोकसभा निवडणुकीत उत्तरेत काँग्रेसने भाजपची झोप उडविली होती. तरीही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोर लावल्याने श्रीपाद नाईक हे खासदार झाले.

127 Constitution Amendment Bill introduced in Lok Sabha)
किमान वेतनाला ट्रेड युनियनचा विरोध; कुशल कामगारास 750 रुपये रोजची मजुरी द्या

परंतु आता म्हादईचा, नोकऱ्यांचा, खाण पट्ट्यात खाण व्यवसाय सुरू होण्याचा असे महत्त्वाचे विषय आहेत. त्यामुळे उत्तर गोव्यासाठी काही मोजके पण तालुकानिहाय पदाधिकारी नेमला गेले आहेत. त्यांच्याकडे मतदारसंघातील विविध भागांची जबाबदारी दिली गेली आहे. त्याठिकाणच्या बुथ समित्या, सदस्य नोंदणी आणि उत्तर गोव्यात लोकसभा म्हणून उमेदवारांविषयी मते महत्त्वाची आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com