Goa CM Pramod Sawant And LOP Yuri Alemao Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly Session: लोकशाहीची हत्या तुम्ही केली! सभागृहात विरोधी पक्षनेते आणि मुख्यमंत्री सावंत यांच्यात शाब्दिक टोलेबाजी

Goa Assembly Monsoon Session 2025: तिसऱ्यांदा असा प्रकार घडला असून, ही लोकशाहीची हत्या असल्याचे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव म्हणाले.

Pramod Yadav

पणजी: तारांकीत प्रश्नाला अतारांकीत प्रश्न करुन त्याचे उत्तर दिल्यावरुन विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी आक्षेप नोंदवला. सरकारने लोकशीहीची हत्या केल्याचा आरोप आलेमाव यांनी यावेळी केला. उपकर आणि अनुपालन संबधित आलेमाव यांचा प्रश्न होता. तर, आणीबाणी लागू करुन तुम्ही लोकशाहीची हत्या केल्याचा पलटवार मुख्यमंत्री सावंत यांनी केला.

पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी प्रश्नोत्तराचा तास सुरु होण्यापूर्वी आलेमाव यांनी उपकर आणि अनुपालन संबधित तारांकीत प्रश्नावर आक्षेप नोंदवला. उपकर आणि अनुपालन संबधित तारांकीत प्रश्नाचे २८ तारखेला अपेक्षित असणारे उत्तर अतारांकीत प्रश्नात रुपांतर करुन देण्यात आले. याबाबत मुख्यमंत्री आणि सभापतींना देखील माहिती देण्यात आल्याचे आलेमाव म्हणाले.

तिसऱ्यांदा असा प्रकार घडला असून, ही लोकशाहीची हत्या असल्याचे आलेमाव म्हणाले.

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी जिंदाल आणि अदाणी यांचे नाव घेत या प्रकरणात तीन ते चार हजार कोटींचा घोटाळा असल्याचा आरोप केला. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सभापतींना प्रश्नोत्तराचा तास सुरु करण्याची मागणी करत, २८ तारखेचा प्रश्न आत्ता उपस्थित करण्याचा संबंध नसल्याचे सांगितले.

मुख्यमंत्री सावंत यांनी आक्रमक पद्धतीने बोलताना देशात आणीबाणी लागू केली त्यावेळी लोकशाहीची हत्या झाली होती, असे प्रतित्युत्तर दिले.

लोकशाहीची सर्वात मोठी हत्या आणीबाणी लागू करण्यात आली त्यावेळी झाली, अशी टीका करताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आलेमाव यांना २८ तारखेच्या प्रश्नाची चर्चा आता करण्याची गरज नसल्याचे त्यांनी नमूद केले.

विजय सरदेसाईंनी यावेळी राज्यातील बेकायदा बांधकामसंबधित ‘गोमन्तक’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्ताचा उल्लेख सभागृहात केला. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर उत्तर आणि दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी बजावलेल्या नोटीसांचा उल्लेख केला.

सरदेसाईंनी सभागृहात दाखवला 'गोमन्तक'

गोमन्तकने पिढीजात घरे, पोर्तुगीजकालीन मंदिरे धोक्यात; गोरगरीब संकटात, या मथळ्याखाली प्रसिद्ध केलेल्या वृत्ताचा दाखला देत सरदेसाईंनी जिल्हाधिकाऱ्यांनी शेकटो नोटीसा बजावल्या असल्याचे सांगितले.

गोमन्तकचे हे सविस्तर वृत्त वरील लिंकवर क्लिक करुन वाचता येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरने मला श्रीमंत केले; गोव्यातील प्रसिद्ध मच्छीमार 'पेले'ने सांगितला अनुभव

Goa News: मुसळधार पाऊस, अपघात; गोव्यातील दिवसभरातील महत्वाच्या बातम्या

ब्रेकअप के बाद... हृदय तुटल्यानंतर Google मधील अडीच कोटी पगाराच्या नोकरीवर मारली लाथ; सुरु केला स्वत:चा व्यवसाय

Asia Cup 2025 Schedule: आशिया कप स्पर्धेतील सामन्यांच्या वेळेत बदल, किती वाजता सुरू होणार सामना? जाणून घ्या

बायकोच्या अफेअरबाबत पतीला कळालं, डंबलने ठेचून तिने नवऱ्याला संपवलं

SCROLL FOR NEXT