Goa Assembly  Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly Speaker: गोवा विधानसभेला मिळणार नवा अध्यक्ष, राज्यपालांनी बोलावले विशेष अधिवेशन; रमेश तवडकरांनंतर कोणाची लागणार वर्णी?

Goa Assembly Speaker Election: गोव्याच्या राजकारणात एक महत्त्वपूर्ण घडामोड घडली आहे. राज्याचे राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांनी गोवा विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे.

Manish Jadhav

Goa Assembly Speaker: गोव्याच्या राजकारणात एक महत्त्वपूर्ण घडामोड घडली आहे. राज्याचे राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांनी गोवा विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. हे अधिवेशन येत्या 25 सप्टेंबर 2025 रोजी होणार असून विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी (Speaker) निवडणूक घेणे हाच त्याचा मुख्य उद्देश आहे. राज्यपाल कार्यालयाने शनिवारी, 6 सप्टेंबर रोजी या संदर्भात एक आदेश जारी केला. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात ज्येष्ठ नेते रमेश तवडकर यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर विधासभा अध्यक्षपद रिक्त झाले. सत्ताधारी पक्षातील अनेक दिग्गजांची नावे सध्या विधानसभा अध्यक्षासाठी चर्चेत आहेत.

राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांनी जारी केलेल्या या आदेशात म्हटले की, "गोवा विधानमंडळाच्या कार्यपद्धती आणि कामकाज नियमांच्या नियम 3 च्या उपनियम (1) नुसार, मी, पुसापती अशोक गजपती राजू गोवा राज्याचा राज्यपाल याद्वारे गुरुवार, 25 सप्टेंबर 2025 ही विधानसभेच्या अध्यक्षांच्या निवडणुकीसाठीची (Election) तारीख निश्चित करत आहे." हा अधिकृत आदेश गोव्याच्या सचिव नम्रता उलमन यांच्या स्वाक्षरीने प्रसिद्ध करण्यात आला.

अध्यक्षांची निवडणूक का महत्त्वाची आहे?

कोणत्याही राज्याच्या विधानमंडळाच्या कामकाजासाठी अध्यक्षपद अत्यंत महत्त्वाचे असते. विधानसभेचे अध्यक्ष सभागृहाचे कामकाज चालवतात, चर्चा सुरळीत पार पाडतात आणि सभागृहात शिस्त राखण्याची जबाबदारी पार पाडतात. ते सभागृहातील नियमांचे अंतिम व्याख्याकार (Interpreter) म्हणून काम करतात आणि सत्ताधारी तसेच विरोधी पक्षांमध्ये निष्पक्ष मध्यस्थ (Impartial Arbitrator) म्हणून त्यांची भूमिका असते.

गोव्यात सध्या विधानसभेचे अध्यक्षपद रिक्त आहे. त्यामुळे नवीन अध्यक्षांची निवड करणे हे विधानसभेच्या कामकाजाच्या सुरळीततेसाठी आणि नियमांनुसार कामकाज चालवण्यासाठी आवश्यक आहे. या निवडणुकीमुळे पुढील काळात गोव्याच्या (Goa) विधानसभेत कोणते पक्ष आणि नेते प्रभावशाली असतील, याचा एक अंदाजही येईल. सत्ताधारी पक्ष आपल्या उमेदवाराला बहुमताने निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील असेल, तर विरोधी पक्षही आपला उमेदवार उभा करुन सत्ताधाऱ्यांची ताकद तपासण्याचा प्रयत्न करेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT