Goa Assembly Election Manohar Ajgaonkar

 
दैनिक गोमन्तक
गोवा

खात्री देऊन सांगतो, उमेदवारी मलाच’

विधानसभा निवडणुकी संदर्भात सर्वत्र चर्चा सुरू आहे. मात्र, त्‍या अफवा की काय ते मला माहीत नाही. पण, भाजप पक्षश्रेष्ठींचा माझ्यावर पूर्णपणे विश्वास आहे.

दैनिक गोमन्तक

पेडणे: विधानसभा निवडणुकी (Goa Assembly Election) संदर्भात सर्वत्र चर्चा सुरू आहे. मात्र, त्‍या अफवा की काय ते मला माहीत नाही. पण, भाजप पक्षश्रेष्ठींचा माझ्यावर पूर्णपणे विश्वास आहे. मतदारसंघातील माझ्या कार्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पेडणे मतदारसंघातून मलाच उमेदवारी मिळेल, याचा मला पूर्ण विश्वास आहे, असा दावा उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी आज पत्रकारांशी बोलताना केला.

गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर (Assembly Election) भाजपचे (BJP) सरकार घडविण्यासाठी मी सहकार्य केले. प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांच्यासारख्या चांगल्या मुख्यमंत्र्याच्या हाताखाली काम केले. त्यानंतर पेडणे व राज्यात भाजप पक्ष वाढविण्यासाठी मी माझ्या कार्यकर्त्यांच्या सहकार्याने कार्य केले. पेडणे मतदारसंघ पूर्णपणे भाजपमय केला. मगोचे उमेदवार म्हणून इतके दिवस कार्य करणारे प्रवीण आर्लेकर यांना भाजपमध्ये घेऊन त्यांना पेडणेतून (Pernem) भाजपची उमेदवारी देण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. या प्रश्नावर बोलताना उपमुख्यमंत्री आजगावकर म्हणाले की, ते त्यावेळी पाहूया. भाजपने तुम्हाला उमेदवारी नाकारली, तर तुम्हाला कुठला राजकीय पक्ष जवळचा आहे? त्यावर ‘अशी वेळच येणार नाही’, असे उपमुख्यमंत्री आजगावकर (Babu Ajgaonkar) म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: क्रिकेट विश्वात खळबळ! 'हा माझा शेवटचा वनडे वर्ल्ड कप', भारत-वेस्टइंडिज मालिकेपूर्वी किंग कोहलीनं फोडला मोठा बॉम्ब

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

SCROLL FOR NEXT