Panaji police station attack: गोवा खंडपीठाने फेटाळल्या सर्व याचिका

या प्रकरणातील सुनावणी सुरू करण्याचे निर्देश खंडपीठाने संबंधित न्यायालयाला दिले आहेत
Panaji police station attack

Panaji police station attack

Dainik Gpmantak 

Published on
Updated on

Panjim: पणजी पोलीस स्थानक हल्लाप्रकरणी (Panaji police station attack) मंत्री जेनिफर मोन्सेरात (Jennifer Monserrate) तसेच अन्य संशयितनी आरोप निश्चितीच्या आव्हान दिलेल्या सर्व याचिका आज मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने (Goa Bench of the Mumbai High Court) फेटाळल्या आहेत.

<div class="paragraphs"><p>Panaji police station attack</p></div>
आमदार कार्लोस आल्मेदांनी दिला राजीनामा; कुठल्या पक्षातून लढवणार निवडणूक?

खंडपीठाच्या या आदेशाला याचिकादारांनी स्थगिती देण्याची विनंती अर्जाद्वारे केली तो अर्जही खंडपीठाने फेटाळला. या प्रकरणातील सुनावणी सुरू करण्याचे निर्देश खंडपीठाने संबंधित न्यायालयाला (Court) दिले आहेत

काय आहे पार्श्वभूमी?

19 फेब्रुवारी 2008 रोजी बाबूश मोन्सेरात (Babush Monserrate) यांनी कार्यकर्त्यांसह पणजी पोलीस स्थानकावर मोर्चा नेला होता. एका तरुणाला मारहाणप्रकरणी संशयितांना अटक करण्याची मागणी केली होती. पोलिसांकडून (Goa Police) त्याची दखल न घेतल्याने पोलीस निरीक्षकांना निलंबित करण्याची मागणी केली. मात्र, हिंसक कार्यकर्त्यांच्या जमावाने पोलिस स्थानकाबाहेर संरक्षक भिंत तयार करून उभ्या असलेल्या पोलिसांवर प्लास्टिक बाटल्या तसेच दगडफेक करून हल्ला केला होता. या हल्ल्यात पोलीस जखमी झाले होते. पोलिसांनी लाठीमार सुरू केल्यावर सर्व नेते व कार्यकर्ते तेथून पसार झाला होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Karapur One Goa Project Protest
Goa First Alliance 2027
Viresh Borkar RG Goa
Morjai Temple Property Misappropriation
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com