Aleixo Sequeira Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly: राज्यात कौटुंबिक न्यायालये स्थापन करणे अशक्य; 18 न्यायाधीशांची कमतरता- आलेक्स सिक्वेरा

Goa Assembly: गोवा विधानसभेचे सध्या पावसाळी अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनात अनेक मुद्यांवरुन विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात जोरदार घमासान पाहायला मिळत आहे.

Manish Jadhav

गोवा विधानसभेचे सध्या पावसाळी अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनात अनेक मुद्यांवरुन विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात जोरदार घमासान पाहायला मिळत आहे. दरम्यान, राज्यात न्यायाधीशांच्या कमतरतेचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. न्यायाधीशांच्या कमतरेतमुळे सरकार कौटुंबिक न्यायालयांची स्थापना करु शकत नाही अशी माहिती राज्याचे कायदा मंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी एका विशेष ठरावादरम्यान दिली. राज्यात 18 न्यायाधीशांची कमतरता आहे. कौटुंबिक समस्यांशी संबंधित प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्याचा सरकार विचार करत असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, राज्यात अनेक खटले प्रलंबित आहेत. आमदार उल्हास तुयेकर यांनी विशेष ठरावादरम्यान कौटुंबिक हिंसाचार आणि इतर समस्यांच्या निराकरणासाठी कौटुंबिक न्यायालये स्थापन करण्याची मागणी केली होती. या मागणीवर राज्याचे कायदा मंत्री यांनी प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी लवकरच पर्यायी व्यवस्था करण्यात येईल असे आश्वासन दिल्यानंतर आमदार तुयेकर यांनी आपला ठराव मागे घेतला.

दुसरीकडे, राज्यात प्रथम श्रेणी न्यायालय, दिवाणी, सत्र आणि जिल्हा न्यायालये अशी न्यायालये आहेत. मात्र पर्याप्त स्वरुपात या न्यायालयांमध्ये न्यायाधीश उपलब्ध नाहीयेत. राज्यात 12 तालुके असून प्रत्येक तालुक्यात एक या प्रमाणे कौटुंबिक न्यायालये स्थापन करायची झाल्यास 12 न्यायाधीशांची आवश्यकता भासेल.

2025 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात कौटुंबिक न्यायालये स्थापन करण्याची मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र ही याचिका फेटाळून लावण्यात आली असल्याचे कायदा मंत्री सिक्वेरा यांनी सांगितले. दरम्यान, राज्यात विवाहित महिलांच्या छळाच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. कौटुंबिक समस्यांशी संबधित याचिका तात्काळ निकाली काढण्यासाठी कौटुंबिक न्यायालय स्थापन करण्याची गरज असल्याचे आमदार शेट्ये यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

''वैभव सूर्यवंशी-अभिषेक शर्मा जोडी टीम इंडियाचे लॉन्ग टर्म ओपनर असू शकत नाहीत...'' माजी क्रिकेटपटूचं मोठं वक्तव्य

Prison Gang War: जेलमध्ये 'हिंसेचा तांडव'! कैद्यांच्या हल्ल्यात 4 सुरक्षा रक्षकांसह 23 जणांचा मृत्यू; ड्रग्ज कनेक्शन आले समोर

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदच! एनआयएने बनवले मुख्य आरोपी; विशेष न्यायालयात चार्जशीट दाखल

IND vs ENG: Playing XI मध्ये मोठा ट्विस्ट! 'या' स्टार खेळाडूला बसावं लागणार बाकावर? इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 साठी टीम इंडियाचा मोठा निर्णय

"आम्हाला भारतात यायचंय!" POK च्या नेत्यांनी मोदी सरकारकडे मागितली मदत, एलओसी उघडण्याची केली मागणी; पाकड्यांना झटका

SCROLL FOR NEXT