Vijay Sardesai  Dainik Gomantk
गोवा

ओबीसीत ‘भंडारी’ला आरक्षण द्या

गोवा फॉवर्ड आमदारांची विधानसभेत मागणी

Dainik Gomantak

Goa Assembly Session: राज्यात भंडारी समाजाची (Bhandari Community) लोकसंख्या मोठ्या प्रमाणात असूनही या समाजाला वेगळे आरक्षण (Reservation For Bhandari Community) न देता इतर मागासवर्गीयांमध्ये (OBC) समावेश करण्यात आला आहे. हा एकप्रकारचा अन्याय आहे त्यामुळे या समाजाला आरक्षणामध्येच वेगळे आरक्षण देण्याचे धाडस सरकारने करण्याचे व त्यावर अर्धा तास चर्चा घेण्याचे आव्हान गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई (Goa Forward Leader Vijay Sardesai) यांनी आज विधानसभेत (Goa Assembly) प्रश्‍नोत्तराच्या तासावेळी दिले.

सरकारने अनुसूचित जाती व जमातीसाठी ठराविक टक्के आरक्षण ठेवले आहे त्याला विरोध नाही. इतर मागासवर्गीयांमध्ये अनेक समाज आहे त्यापैकी भंडारी समाजाची लोकसंख्या गोव्यात मोठी आहे. त्यामुळे त्यांचा ओबीसीमध्ये समावेश केल्याने या समाजाला प्रत्येक क्षेत्रात न्याय मिळत नाही. या समाजावर अन्याय का केला गेला आहे असा प्रश्‍न विधानसभेत आमदार विनोद पालयेकर, आमदार विजय सरदेसाई व आमदार जयेश साळगावकर यांनी विचारला होता. यावर उत्तर देताना समाजकल्याणमंत्री मिलिंद नाईक म्हणाले की, भंडारी समाजावर कसा अन्याय झाला हे दाखवून द्यावे.

भंडारी समाजाला ओबीसीमध्ये विशेष आरक्षण द्यावे अशी तरतूद नाही असे उत्तर मंत्र्यांनी दिले आहे मात्र सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निवाड्यांची माहिती देत आमदार विजय सरदेसाई म्हणाले की, मागासवर्गीय व अति मागासवर्गीय असे वर्गीकरण करता येते. त्यामुळे या समाजाला ओबीसी आरक्षणातच आरक्षण देता येते की नाही हे त्यांनी विधानसभेत सांगावे. त्यामुळे राज्यातील जनतेला हे सरकार या समाजाच्या बाजूने आहे की नाही ते तरी समजेल. जर या विषयावर चर्चा करण्याचे धाडस असेल तर त्यांनी सभागृहात अर्धा तासाची चर्चा घ्यावी असे आव्हान सरदेसाई यांनी दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT