MLA Vijai Sardesai Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: 'त्या' वर्तणुकीची जबाबदारी आमदाराची कशी? सरदेसाईंनी माफी मागण्यास दिला नकार; कोळसा मुद्द्यावरुन काब्रालही आक्रमक

Goa Budget Session 2026: गोवा विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळत आहे.

Manish Jadhav

पणजी: गोवा विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळत आहे. शुक्रवारी विधानसभेच्या प्रेक्षक गॅलरीत घडलेल्या प्रकारावरुन विधानसभा सभापतींनी आमदार विजय सरदेसाई यांना 24 तासांच्या आत माफी मागण्याचे आदेश दिले होते. मात्र, मंगळवारी (10 मार्च) सरदेसाई यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेत माफी मागण्यास स्पष्ट नकार दिला.

गोव्यातील (Goa) जनतेचे प्रश्न मांडणे हे माझे कर्तव्य आहे आणि प्रेक्षक गॅलरीत बसलेल्या व्यक्तींच्या वर्तणुकीवर आमदाराचे नियंत्रण असू शकत नाही, असे ठाम प्रतिपादन सरदेसाई यांनी केले. या वादासोबतच कुडचडेचे आमदार निलेश काब्राल यांनीही कोळसा वाहतुकीच्या मुद्द्यावरुन काही नेत्यांवर निशाणा साधत सभागृहात वातावरण तापवले.

विजय सरदेसाई (Vijai Sardesai) यांनी सभागृहात आपली बाजू मांडताना सांगितले की, आमदार म्हणून आम्हाला लोकांना विधानसभेचे कामकाज पाहण्यासाठी पास देण्याचा अधिकार आहे. मात्र, पास घेऊन आत आलेल्या व्यक्तीने तिथे कसे वागावे, हे आमदाराच्या हातात नसते. विधानसभेत कोणाला प्रवेश द्यायचा आणि कोणाला नाही, याचे सर्वस्वी अधिकार सभापतींकडे असतात.

जर भविष्यात पास घेतलेल्या व्यक्तींच्या वर्तणुकीची जबाबदारी आमदारांनीच घ्यावी, अशी अपेक्षा असेल, तर त्यासाठी सभागृहात सविस्तर चर्चा होऊन स्वतंत्र नियम किंवा कायदा बनवण्याची गरज आहे, असे सरदेसाई यांनी सुनावले. केवळ पास दिला म्हणून संबंधित व्यक्तीच्या कृत्यासाठी आमदाराने माफी मागावी, हा तर्क अयोग्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दुसरीकडे, कुडचडेचे आमदार निलेश काब्राल यांनी कोळसा वाहतुकीच्या मुद्द्यावरुन विरोधकांवर आणि काही बाहेरील नेत्यांवर जोरदार टीका केली. काही नेते स्वतःलाच गोव्याचे एकमेव रक्षक समजत असून माझ्या मतदारसंघात भीतीचे वातावरण पसरवत असल्याचा आरोप काब्राल यांनी केला. "कुडचडे मतदारसंघात कोळसा कधीच येणार नाही, हे मी स्पष्ट करु इच्छितो. काही नेते असे वागत आहेत जणू काही त्यांनाच गोव्याची काळजी आहे आणि आम्ही आमदार गोव्याच्या विरोधात आहोत," अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.

जर गोव्यातील इतर कोणत्याही गावात कोळसा येत असेल, तर तो थांबवण्याची विनंती मी स्वतः मुख्यमंत्र्यांना करेन, असे आश्वासनही त्यांनी दिले. केवळ राजकीय फायद्यासाठी आमदारांना 'गोवा-विरोधी' ठरवण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराही काब्राल यांनी दिला. अधिवेशनातील या दोन मोठ्या घडामोडींमुळे गोव्याच्या राजकारणात सध्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kendra Drishti Yog 2026: शुक्र-गुरुची गट्टी जमणार, पैसा आणि प्रेम दोन्ही मिळणार! केंद्र दृष्टी योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान

RO Water: आर.ओ.चं पाणी खरंच आरोग्यासाठी घातक? तज्ज्ञ डॉक्टरांनी स्पष्टच सांगितलं; अफवांवर विश्वास ठेवण्यापूर्वी जाणून घ्या

Budh Margi 2026: "तुमची स्वप्ने होणार पूर्ण, बुध ग्रहाचा मेगा धमाका'' 21 मार्चपासून 'या' 7 राशींच्या नशिबात मोठा राजयोग

High Court: 'रागाच्या भरात मुलगी बापावर बलात्काराचा आरोप कधीच करणार नाही', जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवताना हायकोर्टाने ओढले ताशेरे; काय नेमकं प्रकरण?

डोळ्यांत पाणी अन् हृदयात धडधड... कुवेतमध्ये अडकलेल्या उर्वशी रौतेलाला विमानातचं कोसळलं रडू; युद्धजन्य स्थितीतील मांडली व्यथा VIDEO

SCROLL FOR NEXT