Goa Assembly Session 2026 Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly Session 2026: खेळाडूंची 98 लाखांची बक्षिसे महिनाभरात मिळणार; क्रीडामंत्री तवडकरांची विधानसभेत हमी, यापुढे वितरणाला विलंब होणार नाही

Sports Prize Money Goa: राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील पदक विजेत्यांसाठी जाहीर केलेली रोख बक्षिसे आणि प्रोत्साहनपर लाभ यांचे वाटप उशिरा केले जात आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्‍ये २०२३ पासून आत्तापर्यंत पदके जिंकलेल्‍या ज्‍या खेळाडूंना राज्‍य सरकारने जाहीर केलेली रोख बक्षिसे मिळालेली नाहीत, त्‍यांना ती ९८ लाखांची बक्षिसे महिनाभरात देण्‍यात येतील, अशी हमी क्रीडामंत्री रमेश तवडकर यांनी मंगळवारी विधानसभेत दिली.

आमदार नीलेश काब्राल यांनी प्रश्‍‍नोत्तराच्‍या तासाला हा प्रश्‍‍न उपस्‍थित केला होता. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील पदक विजेत्यांसाठी जाहीर केलेली रोख बक्षिसे आणि प्रोत्साहनपर लाभ यांचे वाटप उशिरा केले जात आहे. २०२३ पासून अशा स्‍पर्धांमध्‍ये पदके मिळवलेल्‍या खेळाडूंना अजूनही बक्षिसांची रक्‍कम देण्‍यात आलेली नाही.

सरकारी मदत अपुरी असल्यामुळे किंवा ती मिळण्यास विलंब होत असल्यामुळे प्रशिक्षण, कोचिंग, क्रीडा-साहित्य आणि राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील सहभाग यांसाठीचा मोठा खर्च स्वतःच करावा लागत आहे, अशी खंत खेळाडूंकडून व्‍यक्त करण्‍यात येत आहे. याबाबत सरकार कोणती पावले उचणार?, आणि त्‍यांना कधीपर्यंत बक्षिसे देणार?, असे प्रश्‍‍न काब्राल यांनी विचारले.

त्‍यावर, २०२२ पासून आत्तापर्यंत अशा खेळाडूंना ४.८७ लाख रुपयांची बक्षिसे वितरित करण्‍यात आली असून, उर्वरित खेळाडूंना ९८ लाखांची रक्कम देणे बाकी आहेत. पुढील महिनाभरात या बक्षिसांचे वितरण केले जाईल आणि यापुढे त्‍यांना रक्कम देण्‍यास उशिर केला जाणार नाही, असे मंत्री तवडकर म्‍हणाले.

...तरीही ‘त्‍या’ खेळाडूंना एकसारखी रक्‍कम का नाही?

समान दर्जा असलेल्‍या क्रीडा प्रकारांत पदके जिंकणाऱ्या खेळाडूंना बक्षिसांची रक्कम एकसारखी का मिळत नाहीत? असा सवाल काब्राल यांनी केला होता. त्‍यावर, या बक्षिसांसाठी नियम तयार करण्‍यात आले असून, त्‍यानुसारच वेगवेगळ्या खेळांत बक्षिसे मिळवणाऱ्यांना बक्षिसांची रक्कम देण्‍यात येते. राष्‍ट्रीय, आंतरराष्‍ट्रीय स्‍पर्धांत बक्षिसे मिळवणाऱ्या खेळाडूंनाही त्‍याच पद्धतीने बक्षिसे दिली जातात, असे तवडकर म्‍हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Stunt Viral: रिलच्या नादात 'बाहुबली' स्टंट अंगाशी; चालत्या वाहनाच्या छतावर उभे तिघे अचानक कोसळले, एक गंभीर जखमी

Smriti Mandhana Record: एशियन गेम्सच्या महामुकाबल्यात स्मृती मानधानाचा विश्वविक्रम! आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 11,000 धावा करणारी ठरली पहिलीच महिला फलंदाज

Viral News: कायद्याचं शिक्षण घेतलं, पण करिअर निवडलं कुत्रे फिरवण्याचं; दिवसाला कमावते तब्बल 50 हजार, वाचा तरूणीची अनोखी स्टोरी

संपादकीय: राजकीय हस्तक्षेपाचा अभियंत्यांना फटका

'बॉयफ्रेंड असू दे, पण त्याच्यासोबत लग्न नको'; प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलीला अजब सल्ला! स्वतः मात्र लहान वयात अडकली होती विवाहबंधनात

SCROLL FOR NEXT