Goa E20 Petrol: ई-20 वरुन विधानसभेत खडाजंगी! पॉवर पेट्रोल वापरण्याच्या काब्रालांच्या सल्ल्यावर सरदेसाई भडकले; म्हणाले-'हे तर जखमेवर मीठ चोळण्यासारखं'

E20 Petrol Problems Goa: आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत. केवळ पेट्रोलचा वापर केल्यास त्याची किंमत प्रतिलिटर २०० रुपयांहून अधिक होऊ शकते.
E20 Petrol Problems Goa
Goa E20 PetrolDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत. केवळ पेट्रोलचा वापर केल्यास त्याची किंमत प्रतिलिटर २०० रुपयांहून अधिक होऊ शकते. त्यामुळे इथेनॉलमिश्रित पेट्रोलच्या माध्यमातून इंधनाचे दर स्थिर ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

ई-२० इंधनामुळे समस्या जाणवत असतील, तर नागरिकांनी स्पीड किंवा पॉवर पेट्रोलचा वापर करावा, असे मत आमदार नीलेश काब्राल यांनी लक्षवेधी सूचनेवरील चर्चेदरम्यान व्यक्त केले.वाहन खरेदी करणाऱ्यांकडे इंधन खरेदीची क्षमता असते. देशहितासाठी अशा प्रकारचे निर्णय घ्यावे लागतात, असेही काब्राल यांनी सांगितले.

E20 Petrol Problems Goa
Goa Assembly Session 2026: विजयचा चिमटा; सभापतींचा पारा

इंधनामुळे वाहनांना समस्या जाणवत असल्यास राज्यातील पायलटांसाठी सरकारची ईव्ही वाहन खरेदी योजना आहे. टॅक्सी व्यावसायिकांनीही ईव्ही चारचाकी वाहनांचा वापर करावा, असे काब्राल यांनी सुचविले.

‘हा तर जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार’

सरकारी पक्षाकडून केवळ आमदार काब्राल यांनी या विषयावर भूमिका मांडली. मात्र, ‘नागरिकांना परवडत नसेल तर स्पीड किंवा पॉवर पेट्रोल वापरा’ असा सल्ला देणे म्हणजे त्‍यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याची टीका सरदेसाई यांनी केली.

E20 Petrol Problems Goa
Goa Cyber Crime: गोव्यात गुन्हेगारी वाढली, पोलिस करतात काय? विरोधकांचा खडा सवाल, सायबर गुन्ह्यांत 272 टक्के वाढीचा दावा

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com