Goa ST Reservation: धनगर समाजाच्या 'एसटी' दर्जाच्या प्रस्तावावर पुन्हा प्रक्रिया सुरू; मुख्यमंत्र्यांची माहिती, सरदेसाईंच्या प्रश्नाला उत्तर

Dhangar ST Reservation Goa: धनगर समाजाचा अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गात समावेश करण्याची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली आहे.
Dhangar ST Reservation Goa
Goa ST ReservationDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: धनगर समाजाचा अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गात समावेश करण्याची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली आहे. तसेच, ओबीसी आयोगामार्फत कोटा-विदिन-कोटा (आरक्षणांतर्गत आरक्षण) निश्चित करण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे, अशी माहिती मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

विजय सरदेसाई यांनी शून्‍य प्रहराला विचारलेल्‍या प्रश्‍‍नाला उत्तर देताना मुख्‍यमत्री बोलत होते. धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश व्‍हावा, अशी या समाजाची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. विधानसभा निवडणूक तोंडावर आल्‍याने या समाजाने या मागणीची पूर्तता करून घेण्‍यासाठी सरकारवर विविध मार्गांनी दबाव आणण्‍याचे प्रयत्‍न सुरू केले आहेत. त्‍यामुळे मुख्‍यमंत्र्यांनी याबाबतचा प्रस्‍ताव केंद्राला सादर केला होता.

Dhangar ST Reservation Goa
Goa E20 Petrol: ई-20 वरुन विधानसभेत खडाजंगी! पॉवर पेट्रोल वापरण्याच्या काब्रालांच्या सल्ल्यावर सरदेसाई भडकले; म्हणाले-'हे तर जखमेवर मीठ चोळण्यासारखं'

परंतु, केंद्राने हा प्रस्‍ताव पुन्‍हा नाकारत तसे पत्र सरकारला पाठवले. त्‍यामुळे धनगर समाज पुन्‍हा आक्रमक झाला आहे. या पार्श्वभूमीवर, सरदेसाई यांनी धनगर समाजाचा एसटी दर्जा तसेच भंडारी समाजाच्‍या कोटा-विदिन-कोटा मागणीचा प्रश्‍‍न सभागृहात उपस्‍थित केला होता.

सरदेसाईंचा कवळेकरांना नाव न घेता ‘चिमटा’

धनगर समाजाच्‍या एसटी दर्जाच्‍या प्रश्‍‍नावरून आमदार विजय सरदेसाई यांनी माजी उपमुख्‍यमंत्री तथा केपेचे माजी आमदार बाबू कवळेकर यांचे नाव न घेता चिमटा काढला. केंद्र सरकारने विधानसभा निवडणुकीत एसटींना आरक्षण देण्याचे ठरवल्याने काँग्रेसमधून भाजपमध्‍ये उडी मारलेला एकजण रस्त्यावर आला आहे. त्यामुळे यापुढे आमदारांनी पक्षांतर करू नये, असा सल्लाही सरदेसाई यांनी दिला.

Dhangar ST Reservation Goa
Goa Assembly Session 2026: विजयचा चिमटा; सभापतींचा पारा

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com