Goa Assembly Opposition Protest Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly: खासगी विधेयकांवरून विरोधकांचा गदारोळ! कामकाजावर घातला बहिष्‍कार; सभापतींकडून दोनदा सभागृह तहकूब

Goa Assembly Opposition Protest: खासगी विधेयके चर्चेसाठी घेतली नसल्‍याचा निषेध नोंदवत विरोधी सातही आमदारांनी शुक्रवारी विधानसभा सभागृह दणाणून सोडले.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: अर्थसंकल्‍पीय अधिवेशनात आपण सादर केलेली खासगी विधेयके चर्चेसाठी घेतली नसल्‍याचा निषेध नोंदवत विरोधी सातही आमदारांनी शुक्रवारी विधानसभा सभागृह दणाणून सोडले. सभापतींच्‍या सूचनांकडे दुर्लक्ष करीत त्‍यांनी गदारोळ सुरूच ठेवला. त्‍यामुळे पहिल्‍या सभापतींनी दोनवेळा सभागृहाचे कामकाज तहकूब केले. त्‍यानंतर विरोधकांनी कामकाजावर बहिष्‍कार घातला.

शुक्रवारचा दिवस खासगी ठराव, विधेयकांसाठी राखीव ठेवला जातो. त्‍यामुळे आपण सादर केलेली कृषी जमीन संवर्धनासह इतर विधेयकांपैकी एखादे विधेयक शुक्रवारी चर्चेसाठी येईल, अशी आशा विरोधकांना होती.

परंतु, शुक्रवारच्‍या कामकाजात त्‍यातील कोणत्‍याही विधेयकाचा संदर्भ नव्‍हता. त्‍यामुळे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव आक्रमक झाले. शुक्रवारचा दिवस खासगी कामकाजाचा असतानाही आमची खासगी विधेयके चर्चेला का आणली गेली नाहीत?

असा सवाल करीत कृषी जमीन संवर्धन विधेयकावर चर्चा व्‍हायलाच हवी, अशी मागणी त्‍यांनी लावून धरली. सरकार सभागृहात हुकूमशाही करीत असून, ही बाब लोकशाहीसाठी अत्‍यंत गंभीर आहे, असे ते म्‍हणाले.

विरोधकांच्‍या या गदारोळातच मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत त्‍यांना उत्तर देण्‍यासाठी उभे राहिले होते. परंतु त्‍या काळात विरोधकांनी हातात फलक घेत सभापतींसमोरील हौदात धाव घेतली. ‘तुम्‍ही जागेवर बसा, आम्‍हाला बोलू द्या, जागेवर बसलात तर तुम्‍हाला तुमच्‍या प्रश्‍‍नांची उत्तरे मिळतील’, असे सभापती गावकर यांनी त्‍यांना वारंवार सांगण्‍याचा प्रयत्‍न केला.

तरीही विरोधकांनी ‘आम्‍हाला न्‍याय हवा’ असे म्‍हणत घोषणाबाजी सुरूच ठेवली. त्‍यामुळे सभापतींनी प्रथम दहा मिनिटांसाठी कामकाज तहकूब केले.

दरम्‍यान, दहा मिनिटांनंतर कामकाज सुरू झाल्‍यानंतर विरोधकांनी पुन्‍हा हौदात धाव घेत घोषणाबाजी सुरू केली. या काळात सभापतींनी प्रश्‍‍नोत्तरे आणि शून्‍य प्रहरास प्रारंभ केला. परंतु विरोधकांचा गोंधळ वाढल्‍याने त्‍यांनी पुन्‍हा कामकाज दुपारी १ वाजेपर्यंत स्‍थगित केले. सरकार आपली मागणी मान्‍य करण्‍यास तयार नसल्‍याचे लक्षात आल्‍यानंतर विरोधकांनी कामकाजावर बहिष्‍कार टाकला.

मुख्‍यमंत्री, काब्राल ‘लक्ष्‍य’

खासगी विधेयके चर्चेला घेण्‍याची मागणी करीत विरोधी सातही आमदारांनी प्रथम सभापतींसमोरील हौदात धाव घेतली. त्‍यानंतर आमदार वीरेश बोरकर यांनी मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्‍या आसनासमोर जात त्‍यांना विधानसभा कामकाजासंदर्भातील पुस्‍तक दाखवण्‍याचा प्रयत्‍न केला. त्‍यानंतर शून्‍य प्रहरात आमदार नीलेश काब्राल प्रश्‍‍न मांडत असताना सातही विरोधकांनी त्‍यांच्‍यासमोर जात घोषणाबाजी सुरू केली.

काळे कपडे, सभागृहात ‘फेर’

कृषी जमीन संवर्धन विधेयकाचा शुक्रवारच्‍या यादीत समावेश नसल्‍याचे दिसताच सातही विरोधी आमदारांनी काळे कपडे घालून विधानसभा सभागृहात प्रवेश केला. सोबत त्‍यांनी आपण सादर केलेल्‍या विधेयकांचा उल्लेख असलेले फलकही आणलेले होते. गदारोळानंतर सभापतींनी त्‍यांना सभागृहाबाहेर काढण्‍याचे आदेश दिल्‍यानंतर सातही जण सभागृहाच्‍या मध्‍यभागी आले आणि फलक पसरवून त्‍यांच्‍यासमोर ठाण मांडले. त्‍यानंतर तहकुबीनंतर कामकाज सुरू होताच फलकांभोवती फेर धरीत त्‍यांनी सरकारचा निषेध नोंदवला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT