Yuri Alemao Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly: पोलिस विभागातील रिक्त पदे तात्काळ भरा, युरी आलेमाव यांची मागणी; वाचा दिवसभरातील घडामोडी

Goa Assembly Latest Updates Marathi: जाणून घ्या गोव्यातील पावसाळी अधिवेशनाच्या ठळक घडामोडी आणि इतर राजकीय बातम्या.

दैनिक गोमंतक वृत्तसेवा

म्हादई अहवालाविषयी जलस्रोत खात्याने एनआयओला विचारणा केली आहे काय?

म्हादईचा एनआयओचा एक निरीक्षण अहवाल गोवा राज्याकरिता नकारार्थी आला होता. आम्हाला या अहवालाविरोधात आवाज उठवावा लागला होता. एनआयओच्या अहवालाचा फायदा कर्नाटक सरकारला फायदा होऊ शकतो. त्यामुळे या अहवालाविषयी जलस्रोत खात्याने एनआयओला विचारणा केली आहे काय, त्याविषयी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्पष्टीकरण द्यावे. - आमदार वीरेश बोरकर

भोम सरपंचाची उचलबांगडी, एक विरूद्द ६ मतांनी ठराव मंजूर,

भोम-अडकोण पंचायतीत सरपंचावरील अविश्वास ठराव एक विरुद्ध ६ मतांनी मंजूर करण्यात आला. प्रियोळ मतदारसंघात बेतकी-खांडोळा, तिवरे-वरगाव, भोम-अडकोण पंचायतीत अस्थिर वातावरण असून बेतकी-खांडोळ्यात एका अविश्वास ठरावानंतर पुन्हा नव्याने चढाओढीचे राजकारण सुरू असून शेजारच्या तिवरे-वरगावातही उपसरपंचावर अविश्वास ठराव मांडण्यात आला. त्यावर १३ रोजी चर्चा होणार आहे. एकूणच या तिन्ही पंचायतीत बदलाचे वारे वाहू लागले आहेत. त्यात कोण बाजी मारतो, हे पुढील आठव़ड्यात स्पष्ट होणार आहे

माझ्या मंत्रिमंडळात तीन ओबीसी मंत्री असल्याचा अभिमान

माझ्या मंत्रिमंडळात तीन ओबीसी मंत्री असणे हा माझ्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. गोवा सरकारने एक स्वतंत्र ओबीसी कॉर्पोरेशन स्थापन केले आहे, जे शिक्षण, गृहनिर्माण आणि व्यवसाय उद्योजकता कर्जाद्वारे मदत पुरवते: डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

दाजीच्या टोपीचा विषयही घेता येईल

सभापती रमेश तवडकर यांच्या राजीनाम्याच्या चर्चा सुरू असताना आमदार दाजी साळकरांनी घातलेल्या 'टोपी'वरून विरोधकांनी काढला 'चिमटा'. सभापतीपदासाठी दाजींचे नाव आघाडीवर

पोलिस विभागातील रिक्त पदे भरा: युरी आलेमाव

पर्ये मतदारसंघातील चोरीच्या घटनांबद्दल आमदार देविया राणे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी बैठकीत बोलताना युरी आलेमाव यांनी पोलिस विभागात रिक्त पदे भरण्याची मागणी केली.

पारंपरिक माटोळी विकणार्‍यांना 'सोपो' माफ

  • माटोळीचे साहित्य विकणार्‍या गोव्यातील पारंपरिक व्यावसायिकांना सोपो कर माफ. पंचायत, पालिकांना तसे निर्देश देणार : डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

  • आमदार विजय सरदेसाईंचा शू्न्य प्रहराला प्रश्न

१७ (२) अंतर्गत जमीन रुपांतर नाही!

  • १७ (२) अंतर्गत आपण एकाही जमिनीचे रुपांतर केलेले नाही. '३७ अ'अंतर्गत आलेल्या ९५० पैकी केवळ ३५ अर्जांना मान्यता. प्रादेशिक आराखड्याबाबत योग्य वेळी योग्य तो विचार करू : विश्वजीत राणे, मंत्री, नगरनियोजन

  • विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी राणेंना घेर

"जर सनबर्न झाला नाही तर दुसरा कोणीतरी येईल" पर्यटन मंत्री

गोव्यात पर्यटनासाठी अनेक घटकांची आवश्यकता आहे. जर सनबर्न झाला नाही तर दुसरा कोणीतरी येईल. हा कार्यक्रम कुठे घ्यायचा हे सनबर्न आयोजकांनी ठरवायचे आहे: रोहन खवंटे, पर्यटन मंत्री

धार्मिक आणि व्यवहारिक भाषा ही 'मराठी' - आमदार जीत

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Session: म्हादईचा प्रश्न तापला! पाणी प्रश्नावरुन आलेमाव सभागृहात पुन्हा आक्रमक

ChatGPT: चॅटजीपीटीचा धक्कादायक चेहरा! किशोरवयीन मुलांना दिल्या ड्रग्ज अन् आत्महत्येच्या टीप्स; संशोधनातून खुलासा

"म्हादई गोंयची माय,15 कोटी खर्च, तरीही तारीख पे तारीख का?" आमदार बोरकरांचा विधानसभेत थेट सवाल

Video: व्हायरल होण्याच्या नादात तरुणाई बेभान! देशातील सर्वात लांब पुलावर लटकून पठ्ठ्याचा धोकादायक स्टंट; सोशल मीडियावर व्हिडिओ घालतोय धूमाकूळ

Sudan Army Airstrike: सुदानी लष्कराची मोठी कारवाई! दारफुर प्रांतातील विमानतळावर मोठा हवाई हल्ला; 40 कोलंबियन सैनिक ठार

SCROLL FOR NEXT