Goa Assembly Monsoon Session Day 14: पावसाळी अधिवेशनाचा आज तिसरा आठवडा समाप्त झाला. कामकाजाच्या 14 व्या दिवशी विरोधी पक्षातील आमदारांनी पुन्हा मणिपूर हिंसाचारावर चर्चेची मागणी करत गोंधळ घातला. दरम्यान, सभापती तवडकरांनी चर्चेचा हा खासगी ठराव फेटाळला.
दुपारच्या सत्रात कला संस्कृती, क्रीडा, ग्रामीण विकास खात्याचे मंत्री गोविंद गवाडे यांच्या विभागासंबधित मागण्या आणि कपात सूचनांवर विविध मतदारसंघातील आमदारांनी मागण्या मांडल्या. त्यावर मंत्री गावडेंनी उत्तरे दिली.
- गोव्यात आंतरराष्ट्रीय मैदान व्हावे यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे क्रीडा मंत्री गोविंद गावडे म्हणाले. मी आणि आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत आग्रही असल्याचे गावडे म्हणाले.
- लायब्ररी धोरण ऑगस्ट अखेरपासून लागू केले जाईल. अशी खात्री गावडे यांनी दिली.
- 25 ऑक्टोंबरला राज्यात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे उद्धाटन होईल तर, 9 नोव्हेंबर रोजी त्याचा समारोप होईल असे गावडे म्हणाले.
- गोव्यात क्रीडा हब होण्याची क्षमता असल्याचे मंत्री गोविंद गावडे म्हणाले.
शाहजहानचे ताजमहाल कधी पूर्ण होणार ; सरदेसाईंचा गावडेंचा खोचक प्रश्न
कला अकादमीच्या दुरूस्तीचे कधी पूर्ण होणार असा प्रश्न विचारताना आमदार सरदेसाई यांनी शाहजहानचे ताजमहाल कधी पूर्ण होणार? असे खोचक पद्धतीने सरदेसाई यांनी प्रश्न विचारला.
गोविंद गावडे यांनी या प्रश्नाचे उत्तर निश्चित तारीख सांगू शकत नाही, त्याबाबत बांधकाम विभागाला विचारावे लागेल असे गावडे म्हणाले. मग, काब्राल यांनी तारीख द्यावी असे सरदेसाई म्हणाले.
क्रीडा क्षेत्रातील मागण्या कपात सत्रात वास्कोचे आमदार कृष्णा दाजी साळकर यांनी मतदारसंघातील समस्याचा पाढा वाचला.
इफ्फीच्या काही चित्रपटांचे प्रदर्शन मडगावमध्ये करावे - कामत
भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील काही चित्रपटांचे प्रदर्शन मडगावात केले जावे अशी मागणी स्थानिक आमदार दिगंबर कामत यांनी केली आहे.
प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये पांरपरिक संगीताचे धडे दिले जावे - केदार नाईक यांची मागणी
डिचोलीत क्रीडा संबधित पायाभूत सुविधा निर्माण करण्याची आमदार शेट्ये यांची मागणी.
तामसुली खांडोळा येथे ऐतिहासिक बौद्ध लेणी सापडली आहेत. पुरातत्व विभागाने बौद्ध लेणीला भेट द्यावी आणि त्याची नोंद घ्यावी." अशी मागणी पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी केली.
संबधित अधिकाऱ्यांनी त्याठिकाणी पाठवून माहिती घेण्यास सांगतो अशी खात्री पुरातत्व खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी दिली.
रवी नाईक यांच्या मुलाखतीचा दाखला देत ओपनिय पोलचा विषय सांगितला. प्रमोद सावंत यांना हे माहित आहे म्हणून ते मुख्यमंत्री झाले नाहीतर जास्तीत जास्त ते एक खासदार झाले असते.
कोल्ड स्टोरेज निर्माण करण्याबाबत सरकारची काय भूमिका काय याबाबत स्पष्ट केले जात नाही. असे सरदेसाई म्हणाले. तमिळनाडुत अम्मा कँटीन यशस्वी झाले, मी अम्मा कँटीनचा उदोउदो करतोय याचा अर्थ मी जयललीताशी काय संबध आहे असा नाही, माझा आणि तिचा काय संबध नाही असे सरदेसाई म्हणाले.
"आमका जाय शीत कढीं आमका नाका पुरी भाजी" असे केले तर तुम्ही खरे गोंयकार असेही सरदेसाई म्हणाले.
एक स्पटेंबरपासून सर्व कँटीन स्वंयसेवी गटांना देण्यास सुरूवात करणार - मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची हमी. फिशकरी आणि भातासाठी अनुदान देण्याबाबत
मणिपूर चर्चेविषयी विरोधी पक्षातील आमदार सभापती तवडकरांनी दिलेला निर्णय लोकशाही विरोधी म्हणत वेलमध्ये उतरले. त्यानंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मणिपूरचा विषय संवेदनशील असल्याचे सांगत, फादर बोलमॅक्स परेरा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा विषय काढला. फादरने माफी मागितली पण, समाजिक तिढा निर्माण करणारे विषयांना हात घालायला नको असे मुख्यमंत्री सावंत यांनी सभागृहात स्पष्ट केले.
मणिपूर हिंसाचाराचा विषय हा संवेदनशील आहे. तेथील राज्य सरकार त्यावर कारवाई करत आहेच, शिवाय देशाच्या गृहमंत्रालयाने याची दखल घेतली आहे. त्यामुळे मणिपूर हिंसाचारावरील चर्चेचा ठराव फेटाळला असल्याचे सभापती रमेश तवडकर यांनी स्पष्ट केले.
प्रश्नोत्तराच्या तासानंतर मणिपूर हिंसाचारावरील चर्चेच्या ठरावाचा विचार केला जाईल असे सुरूवातीला विरोधकांच्या मागणीनंतर सभापती तवडकर यांनी सांगितले. दरम्यान, विरोधकांनी शून्य प्ररहरानंतर चर्चेची मागणी करत विरोधी पक्षातील आमदार वेलमध्ये उतरले. यावेळी सभापतींनी ठराव फेटाळल्याचा निर्णय दिला.
सभापतींनी दिलेल्या निर्णयाला विरोधीपक्षनेते युरी आलेमाव यांनी लोकशाही विरोधी म्हटले आहे.
सरदेसाईंनी गुरूवारी उल्लेख केलेल्या जमिनीत माझ्या मुलांची नावे नाहीत. ती जमीन वेगळी असल्याचे स्पष्टीकरण मंत्री ढवळीकरांनी दिले. तसेच, ज्या सर्व्हे नंबरमध्ये मुलाने खरेदी केली तो प्लान सरदेसाई मंंत्री असतानाच मंजूर केल्याचे ढवळीकर म्हणाले.
तसेच, सभागृहात बोलताना सरदेसाई यांनी तथ्य पडताळणी करूनच बोलावे असाही सल्ला ढवळीकर यांनी दिला.
आणि सरदेसाई, ढवळीकर यांच्यातील वादावर पडदा पडला
जमिनी खदेरीच्या मुद्यावरून गुरूवारी झालेल्या वादावर ढवळीकरांनी स्पष्टीकरण दिल्यानंतर सरदेसाई यांनी तुमच्या मुलांना चांगला व्यवसाय करावा अशी माझी इच्छा आहे. माझा तुमच्यावर वैयक्तिक राग नाही, काल मला राग आला मी माणूस आहे, मला राग, प्रेम या सगळ्या भावना आहेत. माणूस म्हटल्यावर या भावना असणारच नाही तर तो देव, आणि देव माझ्याशी काय थेट बाेलत नाही. माला कागदपत्रे मिळाली त्यात त्यांच्या मुलाची नावे दिसली म्हणून बोललो. माझा त्यांच्यावर राग नाही. असे सरदेसाई म्हणाले.
गोव्यात किती कंपन्या स्थापन करण्याचे प्रस्ताव आले असा प्रश्न आमदार विजय सरदेसाई यांनी केला. एक कंपनी आली त्या कंपनीने मंत्री सुदीन ढवळीकरांच्या मतदारसंघात अवैधपणे डोंगर कापला याची माविन गुदिन्हो यांना माहिती आहे का? त्यावर मंत्री माविन तेस असल्यास चौकशी करतो असा विश्वास दिला.
तसेच, टाटा कंपनीच्या वरिष्ठांना भेटून काय झाले? कंपनी येण्यास तयार झाली असाही प्रश्न सरदेसाई यांनी केला. याबाबत माविन यांनी कंपनीसोबत सकारात्मक चर्चा सुरू असल्याचे सांगितले. तसेच, टाटाची एक महत्वाची मशीन गोव्यात तयार होते याची माहिती सरदेसाईंना नाही असाही टोला त्यांनी लगावला. मात्र, टास्क फोर्स का स्थापन झाली नाही? असे म्हणत सरदेसाईंनी माविन यांना पेचात टाकले.
ऑनलाईन हॉटेल बुकिंगमधील होणाऱ्या फ्रॉडची चौकशी केली का असा प्रश्न एल्टन डिकॉस्ता यांनी उपस्थित केला. पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी ओटीएस अंतर्गत नोंदणी नसलेल्या हॉटेल्सना नोटीस बजावल्या असल्याचे स्पष्टीकरण दिले.
गोवा फक्त वाईट कारणांसाठी प्रसिद्ध केला जातोय - खंवटे
गोवा फक्त वाईट कारणांसाठी प्रसिद्ध केला जातोय आणि हे थांबवायला पाहिजे पण, गोवा फक्त बीच या पलिकडे जाऊन पर्यटनाचा विकास केला पाहिजे असे पर्यटनमंत्री खंवटे म्हणाले.
पावसाळी अधिवेशनाच्या 14 व्या दिवशी आज पुन्हा विरोधी पक्षातील नेत्यांनी मणिपूर हिंसाचारावरून गोंधळ केला. विरोधकांनी हिंसाचारावरून चर्चेची मागणी केली, तसेच कामकाजात त्याचा समावेश का केला नाही? शुक्रवारी याची चर्चा होईल असे सांगितले असताना त्याचा का समावेश केला नाही. असे विरोधक म्हणाले. त्यावर सभापती रमेश तवडकरांनी प्रश्नोत्तराच्या तासानंतर यावर चर्चा केली जाईल अशी ग्वाही दिली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.