Vishwajit Rane Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly Monsoon Session 2023 : बाईक ॲम्ब्युलन्स संबंधी आरोग्य मंत्र्यांनी दिली 'ही' महत्वाची माहिती

आरोग्यमंत्री राणे : आतापर्यंत आरोग्य विभागाकडे कोणतीही तक्रार आलेली नाही

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Assembly Monsoon Session 2023 : रुग्णवाहिका पोहोचू शकत नाही, अशा दुर्गम ठिकाणी मदतीची गरज असलेल्या रुग्णांवर राज्यातील बाईक ॲम्ब्युलन्स प्राथमिक उपचार करत आहेत. गोव्यातील विविध ठिकाणांहून चार दुचाकी रुग्णवाहिका सध्या तांत्रिक कारणांमुळे कार्यरत नाहीत.

वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत आपत्कालीन सेवा लोकांचे प्राण वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात, असे आरोग्यमंत्री विश्वजित राणे म्हणाले.

कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांना गोव्यात कार्यरत असलेल्या बाईक ॲम्ब्युलन्सची संख्या आणि ही सेवा राज्यभर वाढवणार का, असा अतारांकित प्रश्न विचारला होता.

या प्रश्नाला उत्तर देताना आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी गोव्यात विविध ठिकाणी एकूण ३५ बाईक ॲम्ब्युलन्स असल्याचे नमूद केले.

परंतु यामधून ४ बाईक ॲम्ब्युलन्स कार्यान्वित नसून, त्या वापरण्याचे प्रशिक्षण नवीन मनुष्यबळ घेत असल्याचेही त्यांनी म्हटले.

उपयोगी आरोग्य सेवा

बाईक ॲम्ब्युलन्सबाबत आतापर्यंत आरोग्य विभागाकडे कोणतीही तक्रार आलेली नाही. या बाईक ॲम्ब्युलन्स दुर्गम ठिकाणी जिथे रुग्णवाहिका पोहोचू शकत नाहीत, ट्रॅफिक जॅम इत्यादी समस्या असल्यास तिथे पोहोचून वैद्यकीय सेवा उपलब्ध करतात.

काही अतिरिक्त आवश्यकता असल्यास बाईक ॲम्ब्युलन्स वाढविण्यासंबंधीच्या सूचनांचा विचार केला जाईल, असे आरोग्यमंत्री राणे म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'एक कचोरी, दोन समोसा, काँग्रेस आमदारांचा काय भरोसा?'; निवडणुकांआधी 'आप'चा काँग्रेसवर जोरदार घणाघात!

Goa Accident: गुगल मॅपची वाट, कोलवाळात घात! मद्यधुंद स्‍कॉर्पिओचालकाची स्कूटरला धडक; मुंबईतील महिला पर्यटकाचा मृत्यू, पती अन् मुलगी जखमी

Horoscope 5 October 2026: सोमवारी 'या' राशींवर बरसणार महादेवाची कृपा; धनलाभ आणि प्रगतीचे उत्तम योग!

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

SCROLL FOR NEXT