व्याघ्र प्रकल्प आणि म्हादई अभयारण्यातील लोकवस्तीबाबत आमदार प्रेमेंद्र शेट सभागृहात काय म्हणाले?

व्याघ्र प्रकल्प : काही आमदारांचा विरोध, काहींचे समर्थन
Goa Assembly Monsoon Session 2023 | Premendra Shet
Goa Assembly Monsoon Session 2023 | Premendra ShetDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Assembly Monsoon Session 2023 : गोव्यात व्याघ्र क्षेत्राविषयी उच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. न्यायालयाचा मान राखून आपण वन्यजीवांना जगण्याचा अधिकार ओळखून म्हादई अभयारण्यात असलेल्या लोकवस्तीचा विचार करणे आवश्यक आहे.

त्यावर फेरविचार करणे अत्यंत गरजेचे आहे, असे मत आमदार प्रेमेंद्र शेट यांनी व्यक्त केले. पावसाळी अधिवेशनाच्या आठव्या दिवशी मागण्या आणि कपात सूचना या दुपारच्या सत्रातील कामकाजावर ते बोलत होते.

सुरवातीला गोवा वैद्यकीय महाविद्यालय करीत असलेल्या कामाचे कौतुक करत आमदार प्रेमेंद्र शेट यांनी आभार मानले.

कुशल कर्मचाऱ्याची आवश्‍यकता

मये व डिचोली मतदारसंघात कम्युनिटी हेल्थ सेंटर आहे, ती सुसज्ज इमारत आहे. परंतु त्या ठिकाणी डॉक्टर कमी आहेत. त्याशिवाय तेथे एक्स-रे आणि रेडिओलॉजी मशिन आहे; पण ते चालविण्यासाठी आवश्यक कर्मचारी नाही. मशिन दिल्या आहेत, तर कर्मचारी द्यावेत. नवी रुग्णवाहिका द्यावी.

Goa Assembly Monsoon Session 2023 | Premendra Shet
Goa News - घरे नियमित करण्यासाठी अर्ज दाखल करण्यास ९० दिवस, यापुढे मुदतवाढ नाही | Gomantak TV

मये प्राथमिक आरोग्य केंद्र सरकारी प्राथमिक शाळेत सुरू झाले होते, ते आता चांगल्या पद्धतीने सुरू आहे. आरोग्य केंद्र अद्ययावत करणे आवश्यक आहे. जिल्हा खाण निधीच्या खर्चातून हे अद्ययावतीकरण करावे, असे शेट म्हणाले.

लाडली लक्ष्मीचे अर्ज प्रलंबित

गृहआधारचे ३८० प्रकरणांचे कर्ज प्रलंबित आहे. ७९२ लाडली लक्ष्मीचे अर्ज प्रलंबित आहेत, ते त्वरित निकाली काढून लाभार्थ्यांना न्याय द्यावा. सलीम अली पक्षी अभयारण्यात बॉटिनिकल उद्यान करण्याची सूचना आहे. बांध आहेत, त्याबाजूने खारफुटी लागवड करावी, त्यामुळे बांधांचे संरक्षण होईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com