Dainik Gomantak
गोवा

गोव्यात साडेपाच वर्षांत तीन सामूहिक तर, अल्पवयींवर 235 बलात्काराच्या घटना

आमदार विजय सरदेसाई यांनी याबाबत विचारलेल्या लेखी प्रश्नाला मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले आहे.

Pramod Yadav

गोव्यात मागील साडेपाच वर्षांत 387 बलात्कराच्या घटना घडल्या असून, यात अल्पवयींवर 235 बलात्काराच्या घटना घडल्या आहेत. अशी माहिती मुख्यमंत्री तथा गृहमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत दिली. आमदार विजय सरदेसाई यांनी याबाबत विचारलेल्या लेखी प्रश्नाला मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले आहे.

2018 ते 30 जून 2023 या कालावधीत घडलेल्या 387 बलात्कराच्या घटना घडल्या. 2018 - 62, 2019 - 73, 2020 - 62, 2021 - 73, 2022- 74 आणि 1 जानेवारी ते 30 जून 2023 या काळात 43 बलात्काराचे गुन्हे नोंद झाले आहेत.

यातील 229 अत्याचार 16 ते 18 वर्षीय मुलींवर झाले तर, सहा अत्याचार 15 वर्षांखालील मुलींवर झाले. या काळात तिघींवर सामूहिक अत्याचार झाले. केवळ पाच जणांना शिक्षा ठोठावण्यात आली आहे. तर, 28 संशयितांची पुराव्यांअभावी निर्दोष सुटका झाली असून, तिघांना आरोपातून मुक्त करण्यात आले आहे.

बलात्काराच्या 297 प्रकरणांची विविध न्यायालयात सुनावणी प्रलंबित आहे. यातील काही घटनांमध्ये अल्पवयीन मुलांचा समावेश असल्याने त्यापैकी पाच अल्पवयीन मुलांना मेरशी येथील अपना घरात ठेवण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: मैदानात फटकेबाजी, गॅलरीत 'ब्लॅक मॅजिक'? चाहत्यानं लिंबू फिरवला अन् चेन्नईला पाजलं पाणी; ललित मोदीने विचारले गंभीर प्रश्न

Japan Earthquake: जपानमध्ये 7.5 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; उत्तर-पूर्वी किनारपट्टीवर त्सुनामीचा हाय-अलर्ट VIDEO

IPL 2026 Points Table: पंजाबचा 'पंजा' भारी! डबल हेडरनंतर गुणतालिकेत 'टॉपर'; मुंबई-चेन्नई अन् कोलकाताच्या गोटात चिंतेचं सावट

Israel Lebanon Map: युद्धविरामानंतर इस्रायलचा मोठा 'गेम'! नकाशाद्वारे लेबनॉनच्या भूभागावर वर्चस्व सिद्ध; हिजबुल्लासाठी धोक्याची घंटा

Vaibhav Suryavanshi Crying: टोपीने तोंड लपवले, डोळे पुसले पण हुंदका थांबेना! राजस्थानचा 'वंडर बॉय' ढसाढसा रडला; '16 सेकंदांचा' व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT