When aliens visit Goa:...अन् आकाशातून स्पेसशिप आले खाली; एलियन्सची गोव्यातील बीचवर पार्टी, पाहा फोटो

गोव्यात बीच पार्टी करणाऱ्या काही लोकांना आकाशात एक लख्ख प्रकाश दिसला. प्रकाश हळूहळू जमिनीच्या दिशेने आला आणि एक स्पेसशिप लॅन्ड झाले.
When aliens visit Goa
When aliens visit GoaDainik Gomantak
Published on
Updated on

When aliens visit Goa:

"गोव्यात बीच पार्टी करणाऱ्या काही लोकांना आकाशात एक लख्ख प्रकाश दिसला. प्रकाश हळूहळू जमिनीच्या दिशेने आला आणि एक स्पेसशिप लॅन्ड झाले. त्यातून काही एलियन्स खाली उतरले. सुरूवातीला सर्वजण घाबरले पण, एलियन्स कोणालाही इजा न करता पार्टीत सहभागी झाले."

"पार्टीत सुरू असलेल्या संगीताच्या तालावर एलियन्सनी ठेका धरला. रात्र झाली तरी पार्टी थांबली नाही. एलियन्सनी लोकांना त्यांच्याकडील तंत्रज्ञानाची झलकही दाखवली."

वरील प्रसंग काल्पनिक असून, हे वर्णन 'उत्तम' नावाच्या व्यक्तीने केले आहे. पण, समजा असे झाले तर काय होईल? याचेच चित्रण एआय तंत्रज्ञानाचा वापर करून करण्यात आले आहे.

पृथ्वीवरील मानवाला आणि विज्ञानाला अनेक दिवसांपासून एक कोडं पडलं आहे. ते म्हणजे खरचं परग्रहांवर एलियन्स राहतात का? आणि राहत असतील तर ते कसे दिसतात, काय खातात आणि त्यांचे जीवनमान कसे असेल ? असे अनेक प्रश्न आणि त्याबाबतची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने अलिकडे झपाट्याने प्रगती होत असून, दिवसेंदिवस नव्या गोष्टी समोर येत आहेत. तंत्रज्ञानाचा असाच एक आविष्कार म्हणजे एआय (किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता). एआयचा वापर करून अलिकडे अनेक भन्नाट गोष्टी केल्या जात आहेत.

When aliens visit Goa
When aliens visit GoaDainik Gomantak
When aliens visit Goa
Goa Assembly Monsoon Session: कला अकादमीनंतर क्रीडा स्पर्धेवरुन विरोधकांनी सरकारला घेरले
When aliens visit Goa
When aliens visit GoaDainik Gomantak

कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करून अलिकडे विविध प्रकारच्या इमेज निर्माण करण्याचा नाव ट्रेन्ड आला आहे. सुरूवातीला या ट्रेन्डमध्ये देशाची राजधानी दिल्लीत बर्फवृष्टी झाल्यास काय होईल अशा प्रकारची इमेज तयार करण्यात आली होती. त्यानंतर अशाच प्रकारे देशातील विविध प्रसिद्ध शहरे एआयचा वापर करून कशी दिसतील असे फोटो समोर आले.

When aliens visit Goa
When aliens visit GoaDainik Gomantak

त्यानंतर आता समजा पर्यटन क्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या गोव्यात अचानक एलियन्स आले तर ते कशापद्धतीने मौजमजा करतील याचे चित्रण करणारे काही फोटो समोर आले आहेत.

उत्तम एआय नावाच्या एका इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे फोटो शेअर करण्यात आले आहेत. यात एलियन्स गोव्यात बीचवर, रेस्टॉरंट आणि विविध ठिकाणी चील करताना दाखवण्यात आले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com