Goa Assembly Monsoon Session 2023 Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly Monsoon Session 2023: विजय एकटे भांडले पण... विरोधकांत नाही एकी; मुख्यमंत्र्यांनी काढला चिमटा

विजय सरदेसाई कला अकादमीच्या मुद्यावरून चर्चेसाठी आग्रही असताना विरोधक मात्र प्रश्नोत्तरांचे सत्र सुरू करण्याची मागणी करत जागेवर बसले.

Pramod Yadav

कला अकादमीच्या मुद्यावरून गोवा विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात पहिल्या दिवशी सभागृहात विरोधकांनी गोंधळ घातला. विरोधकांनी दाखल केलेल्या स्थगन प्रस्तावावर चर्चा करण्याची मागणी करत विरोधकांनी गदारोळ घातला आणि सभापती रमेश तवडकर यांनी अर्ध्या तासासाठी सभागृहाचे कामकाज तहकूब केले.

कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर विजय सरदेसाई याच चर्चेसाठी आग्रही असताना विरोधक मात्र प्रश्नोत्तरांचे सत्र सुरू करण्याची मागणी करत जागेवर बसले आणि आमदार सरदेसाई एकाकी पडल्याचे दिसले.

अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर कला अकादमीच्या खुल्या रंगमंचाचे छत कोसळल्याची आयती संधी विरोधकांच्या हाती आल्याने विधानसभेचे कामकाज पहिल्या दिवसापासूनच गदारोळात सुरू झाले. विरोधकांनी यासाठी स्थगन प्रस्ताव दाखल केला आणि प्रश्नोत्तराचे सत्राच्या पूर्वी स्थगन प्रस्तावावर चर्चा करण्याची मागणी केली. यावरून विरोधकांनी हातात बॅनर घेऊन चर्चेच्या मागणीसाठी गोंधळ घातला.

आमदार विजय सरदेसाई हातात बॅनर घेऊन सभापती हौदाच्या दिशेने गेले आणि चर्चेची मागणी करू लागले. दरम्यान, या गोंधळात सभापती तवडकरांनी अर्ध्या तासासाठी कामकाज तहकूब केले. कामकाज पुन्हा सुरू झाले तेव्हा त्याच चर्चेसाठी काही आग्रही असताना काही प्रश्नोत्तराचे सत्र सुरू करण्याच्या मागणीसह जागेवर बसले.

आमदार सरदेसाई कला अकादामीच्या मुद्यावरून चर्चेची मागणी करत सभापतींच्या हौदाजवळ असताना आरजीचे आमदार विरेश बोरकार प्रश्न विचारत असताना, सभागृहात गोंधळ असल्याने 'मला बोलू द्या' अशी विनंती बोरकर यांनी केली. त्यावर "विजय तुम्हाला बोलू देत नाही, विरोधक विभागले आहेत." असा चिमटा मुख्यमंत्री सावंत यांनी काढला.

दरम्यान, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी कला अकादमीच्या खुल्या रंगमंचाचे छत कोसळल्याप्रकरणी स्पष्टीकरण देताना याप्रकरणी दोषींवर कारवाई होणारच अशी ग्वाही दिली. याबाबत बांधकाम खाते तपासणी करत आहे. तसेच, याची आयआयटी रुरकीच्या माध्यमातून तपासणी केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. बांधकाम मंत्री काब्राल देखील याबाबत श्वेतप्रत्रिका काढणार असल्याची माहिती यावेळी सावंत यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT