Goa Police
Goa PoliceDainik Gomantak

CM सावंतांच्या उपस्थितीत गोवा पोलिसांकडून 1.10 कोटी किंमतीच्या अमली पदार्थांची विल्हेवाट

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी 'अमली पदार्थ तस्करी आणि राष्ट्रीय सुरक्षा' प्रादेशिक परिषदेला आभासी पद्धतीने हजेरी लावली.
Published on

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी नवी दिल्ली येथे 'अमली पदार्थ तस्करी आणि राष्ट्रीय सुरक्षा' या विषयावरील प्रादेशिक परिषद पार पडली. देशात 2,378 कोटी रुपयांचे 1 लाख 44 हजार किलो अमली पदार्थ नष्ट केल्याचे अमित शहा यांनी सांगितले.

याबाबत शहांनी राज्ये आणि अमली पदार्थ विरोधी पथक (NCB) यांचे आभार मानले. शाहांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्री आणि राज्यपालांना देखील जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थांची विल्हेवाट लावण्याची विनंती केली. त्यानुसार गोवा पोलिसांकडून मुख्यमंत्री सावंत यांच्या उपस्थितीत 1.10 कोटी किंमतीच्या अमली पदार्थांची विल्हेवाट लावण्यात आली.

गोवा पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथक आणि राज्यातील विविध पोलीस ठाण्यातील पोलिसांनी जप्त केलेल्या 1.10 कोटी रूपये किंमतीचे 25 किलो अमली पदार्थ जप्त केले. कुंडई येथे अमली पदार्थ नष्ट करण्यात आले यावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत, पोलीस महासंचालक जसपाल सिंग व पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Goa Police
Parra Road: आता एवढंच राहिलं होतं! पर्रा रोडवर 'टॉपलेस गर्ल'ची कार राईड, व्हिडिओ व्हायरल

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी 'अमली पदार्थ तस्करी आणि राष्ट्रीय सुरक्षा' प्रादेशिक परिषदेला आभासी पद्धतीने हजेरी लावली. त्यानंतर गोवा पोलिसांनी जप्त केलेल्या अमली पदार्थाची विल्हेवाट लावण्यात आली. अमली पदार्थांना गोव्यात अजिबात स्थान नाही, राज्यातून ही कीड बाहेर ठेवण्यासाठी आम्ही कायम दक्ष आहोत. असे गोवा पोलिसांनी यावेळी म्हटले.

जप्त करण्यात आलेल्या 1,44,000 किलो अमली पदार्थ नष्ट केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गृह खाते आणि पोलिसांचे कौतुक केले आहे. गृह मंत्रालयाच्या दृढ आणि अथक प्रयत्नाचे हे एक उत्तम उदाहरण आहे. असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com