Goa assembly monsoon session 2023 | Vijai Sardesai Dainik Gomantak
गोवा

'राज्यात बनावट दारू आल्यास गोवा संपेल', विजय सरदेसाईंनी विधानसभेत का व्यक्त केली भीती

सरकारने मोपावर मद्य दुकाने चालविण्यास परराज्यातील लोकांना परवाने दिल्यास तुम्हाला शाप लागेल असेही सरदेसाई म्हणाले.

Pramod Yadav

Goa assembly monsoon session 2023: गोव्यात बाहेरून येणारे बनावट मद्य मिळायला लागल्यास गोवा संपेल अशी भीती आमदार विजय सरदेसाई यांनी व्यक्त केली. तसेच, सरकारने मोपावर मद्य दुकाने चालविण्यास परराज्यातील लोकांना परवाने दिल्यास तुम्हाला शाप लागेल असेही सरदेसाई म्हणाले. मोपा विमानतळावरील मद्य परवान्यावरून सरदेसाई यांनी प्रश्न उपस्थित केले.

गोव्यात मद्याची दुकाने सर्वत्र आहेत. अल्पसंख्याक आणि हिंदू बहुजन समाजातील लोक ही दुकाने चालवतात. मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर मद्याच्या दुकानासाठी परवाने दिले जाणार आहेत अशी माहिती आहे. पण, मोपाने फक्त दाबोळीचेच नुकसान केले नाही तर राज्यातील मद्य व्यवसायाचे देखील नुकसान करणार असे दिसतेय.

मोपावर मद्य परवाना देण्याचा राज्य सरकार विचार करत असेल, तर तुम्ही जीएमआर कंपनीच्या इशाऱ्यावर का नाचत आहात? सुरूवातीला आंतरराष्ट्रीय उड्डाणे दाबोळीवरून मोपावर वळविण्यात आली. आता मोपावर मद्य मिळाल्यास लोक तिथेच मद्य घेतील आणि तेथूनच घेऊन जातील यामुळे गोव्यातील मद्य व्यवसायाचे मोठे नुकसान होईल असा प्रश्न सरदेसाई यांनी सभागृहात उपस्थित केला.

देश विदेशातील प्रत्येक विमानतळावर किरकोळ विक्रीची दुकाने असतातच, त्याच प्रमाणे मोपा विमानतळावर दुकाने आल्यास त्यात काहीच गैर नाही. असे उत्तर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिले. पण ही दुकाने गोंयकारांना दिली जावीत अशी मागणी सरदेसाई यांनी केल्यावर हा धोरणात्मक नर्णय असल्याचे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.

सरदेसाईंना बहुजनांचे कैवारी तेच आहेत असे वाटते - मुख्यमंत्र्यांचा टोला

विजय सरदेसाईंना बहुजनांचे कैवारी तेच आहेत असे वाटते पण, सरकार सर्वांची काळजी घेत असून, योग्य तो निर्णय घेतला जाईल असे सावंत म्हणाले.

दरम्यान. विजय सरदेसाईंनी अनेक परराज्यातील लोक रात्रीच्या वेळी मद्याची दुकाने चालवतात त्यांच्यावर कारवाई करणार का असाही प्रश्न केला. गोंयकारांची मालकी असलेली दुकाने येथील लोकांनी बाहेरच्या लोकांना चालविण्यासाठी दिली आहेत. असे सांगितले तसेच, याबाबत सर्वेक्षण करण्याची तयारी देखील त्यांनी दर्शवली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Suresh Prabhu: गोवेपण टिकवायचं असेल तर.... ; सुरेश प्रभूंनी सोप्या भाषेत समजावून सांगितलं

Pilgao Farmers Protest: खनिज वाहतुकिचा प्रयत्न हाणून पाडणार, पिळगाव शेतकऱ्यांचे वेदांता विरोधातील आंदोलन तीव्र, ST समाजही सहभागी

Goa Crime: 35.50 लाखांचा घोटाळा; Central Bank Of India च्या व्यवस्थापकाला अटक

Goa Live News Today: लाचखोरी प्रकरणी आयटीडी अधिकाऱ्यांना सशर्त जामीन मंजूर!

Suyash Prabhudessai: गोमंतकीय क्रिकेटप्रेमींची घोर निराशा, अष्टपैलू 'सुयश' IPL मध्ये Unsold

SCROLL FOR NEXT