रिअर अ‍ॅडमिरल अजय डी थिओफिलस यांनी 'फ्लॅग ऑफिसर कमांडिंग गोवा एरिया' म्हणून पदभार स्वीकारला

आयएनएस हंस, गोवा येथे आयोजित सेरेमोनियल परेडमध्ये त्यांनी पदभार स्वीकारला.
Rear Admiral Ajay D Theophilus assumed charge as FOGA
Rear Admiral Ajay D Theophilus assumed charge as FOGAPIB
Published on
Updated on

Rear Admiral Ajay D Theophilus assumed charge as FOGA: रिअर अ‍ॅडमिरल अजय डी थिओफिलस यांनी फ्लॅग ऑफिसर कमांडिंग गोवा एरिया (FOGA)  म्हणून पदभार स्वीकारला. यापूर्वी त्यांनी भारतीय नौदल अकादमीचे उप कमांडंट म्हणून काम पाहिले आहे. आयएनएस हंस, गोवा येथे आयोजित सेरेमोनियल परेडमध्ये त्यांनी पदभार स्वीकारला.

रिअर अ‍ॅडमिरल अजय डी थिओफिलस यांची 01 जुलै 1991 रोजी भारतीय नौदलाच्या कार्यकारी शाखेत नियुक्ती झाली. जून 1992 मध्ये त्यांची पायलट अभ्यासक्रमासाठी निवड झाली आणि अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर ते नौदल विमानवाहूच्या लढाऊ प्रवाहात सामील झाले.

थिओफिलस यांनी किरण, HPT-32, मिग-21, सी हॅरियर आणि मिग-29K विमानांचे सारथ्य केले आहे. 3,000 तासांपेक्षा जास्त विमान उड्डाणाचा त्यांना अनुभव आहे. आयएनएस विक्रमादित्यवर MiG-29K उतरवणारे ते पहिले भारतीय पायलट होते. त्यांनी 2001 मध्ये फ्लाइंग इन्स्ट्रक्टर्स अभ्यासक्रम पूर्ण केला असून ते सी हॅरियर आणि मिग-29K विमानांचे प्रशिक्षक आहेत.

PIB
Rear Admiral Ajay D Theophilus assumed charge as FOGA
Bicholim Municipality: खाणींना सहकार्य कराच, पण आमचाही विचार करा- सेझाच्या कामगारांची मागणी
PIB

MiG-29K प्रकल्पाचे प्रमुख म्हणून रिअर अ‍ॅडमिरल थिओफिलस यांची निवड करण्यात आली आणि रशियामध्ये प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी स्क्वाड्रनचे नेतृत्व केले.

आयएनएस विक्रमादित्य या विमानवाहू युद्धनौकासोबत संयुक्तरित्या स्क्वाड्रनचे नेतृत्व केले. त्यांनी आयएनएस विक्रमादित्यचे कॅप्टन (एअर) म्हणूनही काम केले आहे. त्यांच्या कमांडमध्ये आयएनएस त्रिंकट, तलवार आणि तर्कश यांचा समावेश आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com