Vishwajit Rane Dainik Gomantak
गोवा

Goa Forest Fire : जळलेल्‍या वनक्षेत्रात भूरूपांतर होणार नाही; वनमंत्र्यांनी केले आश्‍‍वस्‍त

‘बिल्‍डर लॉबी’विषयक कयास अनाठायी

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Assembly Monsoon Session 2023 : म्हादई अभयारण्यासह राज्यातील अनेक जंगलांमध्ये मार्चच्या पहिल्या आठवड्यात लावण्यात आलेल्या आगींमध्ये 480 हेक्टर वनक्षेत्र बेचिराख झाले आहे. यातील 365 हेक्टर क्षेत्र अभयारण्य राखीव क्षेत्र आणि नॅशनल पार्कचा भाग असल्याची माहिती वनमंत्री विश्वजीत राणे यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तर तासाला दिली.

त्‍या भागांत कदापि भूरूपांतर होणार नाही. तेथे कोणतीही ‘बिल्‍डर लॉबी’ सक्रिय होईल हा कयास अनाठायी आहे. तसे निदर्शनास आणून दिल्‍यास कठोर कारवाई केली जाईल, असेही वनमंत्री म्हणाले.

या विषयावरून आज विधानसभेत विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केला. विधानसभा अधिवेशनात प्रश्नोत्तराच्‍या तासाला आमदार कार्लुस फेरेरा यांनी म्हादई अभयारण्यात लागलेल्या आगीचा प्रश्न उपस्थित केला होता.

यावर मंत्री राणे म्हणाले, "प्रत्यक्ष स्थिती समजून घेतली पाहिजे. मोर्लेसारख्या ठिकाणी अतिशय घनदाट डोंगरमाथ्यावर आग लागल्यास तिथे बंब पोहोचवणे कठीण होते. त्यामुळे वायुदल दल, नौदलाची मदत घेतली."

"तसेच अन्य ठिकाणी आग लागल्यास त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जी यंत्रणा लागणार आहे, त्याचा आराखडा बनवला जात आहे. या संबंधीचा सविस्तर अहवाल तयार केला असून, आगीमध्ये नक्की किती क्षेत्र भक्ष्‍यस्‍थानी पडले? कोणत्या प्रकारची जैवविविधता नष्ट झाली याचा उल्‍लेख आहे. तो आपण लवकरच विधानसभेत सादर करू," असेही मंत्री राणे म्हणाले.

विरोधकांचे प्रश्‍‍न

यंदा जो प्रकार घडला, तो पुढे घडू नये यासाठी वन खात्याने कोणत्या उपाययोजना केल्या आहेत? डोंगरमाथ्यावर अग्निशमन बंब पोहोचत नाहीत, त्यासाठी काय तोडगा काढला? आग लागण्याची संभाव्य स्थळे निश्चित केली आहेत का? जे क्षेत्र आगीत भस्म झाले, त्याचे भूखंड पाडून बिल्डर लॉबीला दिले जाऊ नयेत, याची काळजी घेणार का?

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mandovi Bridge: मांडवी पुलावर 'नो एन्ट्री'! 11 जानेवारीला 'या' वेळेत नव्या आणि जुन्या पुलावरून वाहतूक पूर्णपणे बंद

Raia Fire News: ..आणि बघता बघता डोंगरच पेटला! राय येथील घटना; अग्निशामक दलाचे शर्थीचे प्रयत्न

Goa Nature Conference 2026: निसर्गाशी नाते करा घट्ट! गोव्यात रंगणार पहिले निसर्ग संमेलन; तारीख, वेळ जाणून घ्या..

क्रिकेट विश्वावर शोककळा! रणजी क्रिकेटपटूचा मैदानातच मृत्यू, बॅटिंगनंतर छातीत दुखू लागले अन्...

Kushavati District: ‘कुशावती’बाबत नवीन अपडेट! भाडेकरू, हॉटेल कामगारांच्या पडताळणीचे आदेश; ओळखपत्राची सक्ती

SCROLL FOR NEXT