भारतीय तटरक्षक दलाचे गोव्यातील समुद्रात 'सिंधु साधना' जहाजावर बचावकार्य; वाचवले 36 जणांचे प्राण

दोन्ही जहाजे 28 जुलै पर्यंत मुरगाव बंदरावर पोहोचण्याची अपेक्षा
Research Survey Vessel SINDHU SADHANA
Research Survey Vessel SINDHU SADHANADainik Gomantak

Indian Coast Guard saved 36 lives : 'सिंधु साधना' ( Research Survey Vessel SINDHU SADHANA ) या संशोधन जहाजाचे इंजिन पूर्णपणे निकामी झाल्याने ते समुद्रात अडकले होते. या जहाजावर बचावकार्य राबविण्यात भारतीय तटरक्षक दलाला यश आले आहे. धाडसी बचाव कार्यात असाधारण कार्यक्षमता आणि जलद प्रतिसाद दाखवत तटरक्षक दलाने 36 जणांचे प्राण वाचले आणि संभाव्य पर्यावरणीय आपत्ती टाळली.

Research Survey Vessel SINDHU SADHANA
LLB Admission Scam: कारे विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सिल्वा अखेर निलंबित; पुत्राच्या प्रवेशासाठी केला घोटाळा

पीआयबी मुंबईने जाहीर केलेल्या प्रसिध्दिपत्रकानुसार, सीएसआयआर-राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्था (सीएसआयआर-एनआयओ) 'सिंधु साधना' हे जहाज संशोधनाचे कार्य करते. 'सिंधु साधना' बहुमोल वैज्ञानिक उपकरणांनी सुसज्ज आणि महत्त्वपूर्ण संशोधन माहिती घेऊन जात होते.

'सिंधु साधना' जहाज कारवारच्या दिशेने जात असताना त्याच्या जहाजाच्या इंजिनात बिघाड झाल्याने इंजिन पूर्णपणे निकामी झाले. त्यामुळे ते गतिहीन होते आणि समुद्राच्या प्रवाहावर ते चालत होते. 26 जुलै रोजी दुपारी एक वाजता गोव्यातील तटरक्षक दलाच्या जिल्हा मुख्यालयात यासंबंधीचा संदेश प्राप्त झाला.

पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील कारवार किनाऱ्यापासून हे जहाज जवळ असल्याने तेलगळतीचा धोका होण्याची शक्यता होती, ज्यामुळे सागरी पर्यावरणाचीही हानी झाली असती. संदेश प्राप्त होताच तटरक्षक दलाने आयसीजीएस सुजित आणि आयसीजीएस वराह या दोन अत्याधुनिक जहाजांवर कुशल पथकांसह बचाव मोहीम सुरू केली.

Research Survey Vessel SINDHU SADHANA
Monalisa In Goa: भोजपुरी ब्युटी मोनालिसाचा गोव्यातील 'बोल्ड' अवतार व्हायरल, पाहा फोटो

आपत्तीची संभाव्य तीव्रता ओळखून भारतीय तटरक्षक दलाने जहाजाचे रक्षण, सागरी परिसंस्थेचे रक्षण आणि जहाज मध्येच थांबून राहू नये यासाठी तातडीने उपाययोजना सुरू केल्या.

अतिशय प्रतिकूल हवामानात, समुद्रातील लाटा आणि 45 नॉटीकल मैलापर्यंत वारे वाहत असतानाही भारतीय तटरक्षक दलाने संकटात सापडलेल्या सीएसआयआर-एनआयओ जहाजाची बचाव मोहीम हाती घेतली. अशा आव्हानात्मक परिस्थितीत जहाज टोईंग करण्यासाठी प्रचंड कौशल्य आणि दृढ निश्चयाने आयसीजीएस सुजीतने 'सिंधू साधना' जहाजाला यशस्वीरित्या टोईंग केले.

दोन्ही जहाजे सध्या गोव्याच्या दिशेने येत आहेत आणि 28 जुलै रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास मुरगाव बंदरावर पोहोचण्याची अपेक्षा आहे. सीएसआयआर-एनआयओ संशोधन जहाजावरील सर्व कर्मचारी सुरक्षित आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com