Vijay Sardesai Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly Monsoon Session: मंत्री गावडेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा - सरदेसाई

विजय सरदेसाई : कला अकादमीप्रकरणी खोटारडेपणा; पुरावाही सादर

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Assembly Monsoon Session कला अकादमीच्या खुल्या रंगमंचाचे छत कोसळण्‍याच्‍या प्रकाराला अकादमीचे अध्यक्ष आणि कला व संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे हेच जबाबदार आहेत. सभागृहात आणि सभागृहाबाहेरही ते खोटे बोलत आहेत, असा आरोप करत आमदार विजय सरदेसाई यांनी आज व्हिडिओद्वारे पुरावा सादर केला.

त्यामुळे गावडे यांची मंत्रिमंडळातून तात्काळ हकालपट्टी करावी आणि या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी सरदेसाई यांनी आज सभागृहात लावून धरली.

पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मागील सोमवारी 17 जुलै रोजी नूतनीकरण सुरू असलेल्या कला अकादमीच्या खुल्या रंगमंचाचे छत कोसळले होते.

त्‍यानंतर मंत्री गोविंद गावडे यांनी तात्काळ कोसळलेला भाग हा नूतनीकरण करण्यात येणाऱ्या कला अकादमीचा नव्हता, तो ५० वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या रंगमंचाचा होता, त्यामुळे तो कोसळला असे जाहीर केले होते.

यावर आज आमदार सरदेसाई यांनी सांगितले, की काही दिवसांपूर्वी याच परिसरात फिरून मंत्री गावडे यांनी या संपूर्ण भागाचे कशाप्रकारे नूतनीकरण करण्यात येत आहे याची सविस्तर माहिती दिली होती.

नूतनीकरण करण्यात येणाऱ्या कला अकादमीच्या मुख्य भागाबरोबर या भागाचेही नूतनीकरण सुरू असल्याचा व्हिडिओ सादर करत सरदेसाई यांनी मंत्री गावडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

जर ते राजीनामा देत नसतील, तर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गावडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणीही त्‍यांनी केली.

कला व संस्‍कृतीमंत्री गोविंद गावडे खोटे बोलत आहेत हे आता व्हिडिओमुळे सिद्ध झाले आहे. हा केवळ कोट्यवधी रुपयांचा घोटाळाच नाही, तर हे एवढे मोठे प्रकरण खोटे बोलून झाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे सरकारच खोटारडे असून दिवसेंदिवस सत्य बाहेर येत आहे आणि आम्ही ते जनतेसमोर आणूच. - विजय सरदेसाई, गोवा फॉरवर्डचे आमदार

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT