Goa Assembly Monsoon Session: 'वीज खात्यात 145 कोटींचा घोटाळा', भाजप आमदारांचा सरकारला घरचा आहेर

मायकल लोबो, संकल्प आमोणकर यांचे विधानसभेत आरोप
Goa Assembly Monsoon Session 2023
Goa Assembly Monsoon Session 2023Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Assembly Monsoon Session मागील सरकारच्या काळात वीज खात्याने वापरलेले एबीसी (एरियल बंच केबल) हा १४५ कोटींचा घोटाळा असल्याचा आरोप भाजपचे आमदार मायकल लोबो आणि संकल्प आमोणकर यांनी केला आहे.

त्यामुळे सत्ताधारी सरकारला हा घरचा आहेर मानावा लागेल. ऊर्जामंत्री सुदिन ढवळीकर यांनीही हा बंच केबलिंग प्रकल्प अपयशी ठरल्याची कबुली आज विधानसभा अधिवेशनात दिली.

सभागृहात आज वीज खात्याच्या प्रश्नोत्तरानंतर दुपारच्या सत्रातही ऊर्जामंत्री सुदिन ढवळीकर यांना विरोधी आमदारांबरोबर सत्ताधारी आमदारांनीही कोंडीत पकडत प्रश्नांचा भडिमार चालूच ठेवला.

Goa Assembly Monsoon Session 2023
Goa Assembly Monsoon Session: गोव्यात आता प्रत्येक गावासाठी मोफत वायफाय, शॅक मॉडेलसह खंवटेंच्या अनेक मोठ्या घोषणा

बंच केबलिंग हा महाघोटाळा असून याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आमदार मायकल लोबो यांनी केली. त्यानंतर आमदार संकल्प अमोणकर यांनीही हा मोठा घोटाळा असून तो कोणाच्या काळात झाला याचा खुलासा ऊर्जामंत्री ढवळीकर यांनी करावा. यात कोणाचा सहभाग आहे हेही जाहीर करावे. अन्यथा मंत्र्यांनी स्वतः जबाबदारी स्वीकारावी, अशी टीका केली.

Goa Assembly Monsoon Session 2023
Goa Assembly Monsoon Session 2023 : बंद सरकारी शाळांच्या इमारतींमध्ये भरणार अंगणवाड्या : प्रमोद सावंत

विरोधकही आक्रमक

विरोधकांनी घोटाळ्याची सभागृह समितीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी केली. यावर ऊर्जामंत्री सुदिन ढवळीकर यांनी आपण कोणत्याही एजन्सीमार्फत या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तयार आहोत. एरियल बंच केबल टाकली त्यावेळी आपण आणि नीलेश काब्राल उर्जामंत्री नव्हतो, असे सांगितले.

Goa Assembly Monsoon Session 2023
LLB Admission Scam: 'प्राचार्य दा सिल्वा यांना निलंबित करा'; विद्यापीठाचे महाविद्यालयाला निर्देश

ढवळीकर उवाच...

  • राज्य सरकारने २०१७ मध्ये जुन्या ओव्हरहेड पॉवर लाईन्सला नवीन प्रकारच्या केबलने बदलण्याच्या उद्देशाने १४९ कोटी रुपयांची निविदा काढली होती.

  • प्रत्येक मतदारसंघात ४० कोटी रुपयांची भूमिगत केबल टाकण्याचे काम आधीच हाती घेतले आहे. १९६५ पासून न बदललेल्या आणि ठिसूळ झालेल्या वीजतारा बदलण्याचे काम विभागाने हाती घेतले आहे.

  • एबीसी प्रकल्प अपयशी ठरला असून ७३१.६६ किलोमीटर केबल टाकली आहे.

  • ४९८.६८ किलोमीटर सुरवातीला चार्ज करण्यात आली आणि आजपर्यंत ४४८.९३ किलोमीटर सेवा सुरू आहे.

  • एरियल बंच केबल आणि जॉइंटिंग किट ऊन, पावसाच्या संपर्कात आल्याने निकामी होतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com