MAPUSA MUNICIPAL COUNCIL Dainik Gomantak
गोवा

Goa Election: म्हापशात सारेच काही अनिश्चित!

विरोधकांची भिस्‍त युतीवर माजी उपमुख्‍यमंत्री फ्रान्‍सिस डिसोझा यांच्या कुटुंबीयांच्या मतांवर भाजपची मदार

सुदेश आर्लेकर

म्हापसा: आगामी विधानसभा निवडणुकीबाबत (Assembly Elections) म्हापसा मतदारसंघात नेमका कोण विजयी होईल, हे सध्याच्या घडीस तरी ठामपणे सांगताच येत नाही. त्याबाबत सारेच काही अनिश्चित आहे. काँग्रेसची (Congress) युती गोवा फॉरवर्ड (Goa Forword) व राष्ट्रवादी पक्ष यांच्याशी होतेय की नाही या मुद्द्यावरदेखील येथील उमेदवारांचे यशापयश अवलंबून आहे. भाजपविरोधी (BJP) पक्षांत युती झाल्यास काँग्रेसला या ठिकाणी पूरक वातावरण प्राप्त होण्याची शक्यता आहे. परंतु, या साऱ्या जर-तरच्या गोष्टी आहेत.

मागच्या पोटनिवडणुकीतील काँग्रेसचे उमेदवार सुधीर कांदोळकर हे तसे प्रबळ उमेदवार असल्याने त्यांना येत्या निवडणुकीतही (Elections) त्याच पक्षाची उमेदवारी मिळाल्यास ते तुल्यबळ उमेदवार ठरू शकतात. कारण, मागच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार ख्रि. फ्रान्सिस डिसोझा (बाबूश) यांचे पुत्र ज्योशुआ डिसोझा हे केवळ हजारभराचे मधाधिक्य घेऊन विजयी झाले होते. त्यावेळी बाबूश डिसोझा यांचे निधन झाले होते व त्यामुळे मतदारांत निर्माण झालेल्या सहानुभूतीचा लाभ ज्योशुआ यांना थोड्याफार प्रमाणात झालेला होता. आगामी काळात तशी सहानुभूती भाजप उमेदवाराला मिळणार नाही. त्याशिवाय शहरातील विविध प्रकल्पांच्या रेंगाळलेल्या कामांमुळे विद्यमान आमदाराविषयी मतदारांत काहीसा नाराजीचा सूर आहे. त्यामुळे सुमारे सहाशे मते इकडे-तिकडे झाली तर ते भाजपला महागात पडू शकते, अशी येथील एकंदर राजकीय स्थिती पाहता दिसून येते.

१९९९ नंतर काँग्रेसच्‍या मतांमध्‍ये झाली घसरण

गुरुदास नाटेकर यांनी दोन वेळा काँग्रेसतर्फे निवडणूक लढवली होती. वर्ष १९९४ मधील निवडणुकीत त्यांना ६,४८८, तर १९९९ मध्ये त्यांना ४०२७ मते मिळाली होती. त्यानंतर मात्र काँग्रेसच्या मतांत नेहमीच घसरण झाली आहे. २०१७ मधील निवडणुकीत तर काँग्रेसचे विजय भिके यांना केवळ ३,०१३ (१३.४८ टक्के) मते मिळाली होती, तर भाजपचे फ्रान्‍सिस डिसोझा यांना तब्बल १०,९५७ (४९.०१ टक्के) मते मिळाली होती. त्यावेळी मगो पक्षाचे उमेदवार विनोद फडके हे ४,१२९ (१८.४७ टक्के) मते मिळवून द्वितीय स्थानावर होते. मात्र, डिसोझा यांच्या निधनानंतर वर्ष २०१९ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार सुधीर कांदोळकर यांनी काँग्रेसची मतसंख्या वाढवण्यात अर्थांत १०,०१६ पर्यंत नेण्यात यश मिळवले होते. त्यावेळी विजयी झालेले भाजपचे उमेदवार ज्योशुआ डिसोझा यांनी काँग्रेसचे कांदोळकर यांच्यापेक्षा केवळ १,१५१चे मताधिक्य प्राप्त केले होते.

Vote's Percentage

डिसोझा कुटुंबाची एकगठ्ठा मते

या मतदारसंघात वर्ष १९९९ पासून आजपर्यंत अर्थांत सुमारे पाव शतकाच्या कालखंडात सलगपणे पाच वेळा निवडून आलेले माजी आमदार फ्रान्‍सिस डिसोझा तसेच त्यांच्या निधनानंतर झालेल्या वर्ष २०१९ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत निवडून आलेले त्यांचे पुत्र आमदार ज्योशुआ डिसोझा यांची पकड आहे. या कुटुंबीयांचा स्थानिक कोमुनिदाद समितीवर वरचष्मा आहे. तसेच कोमुनिदादच्या जमिनींत बेकायदा उभ्या राहिलेल्या झोपड्यांत वास्तव्य करून असलेल्या मतदारांवर त्यांचा वचक आहे. त्यामुळे ती खात्रीची एकगठ्ठा मते त्यांना आजवर साहाय्यभूत ठरेलेली आहेत. भाजपची त्याच मतांवर भिस्त आहे.

प्रमुख दावेदार

मतदारसंघात भाजपची उमेदवारी विद्यमान आमदार ज्योशुआ डिसोझा यांनाच मिळेल असे एकंदर परस्थितीचा कानोसा घेतला असता जाणवत आहे. असे असले तरी स्वत:ला उमेदवारी मिळावी यासाठी माजी नगराध्यक्ष संदीप फळारी, रायन ब्रागांझा, रूपेश कामत हेदेखील प्रयत्नशील असल्याचे दिसून येते. दुसऱ्या बाजूने काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीसाठी सुधीर कांदोळकर हे प्रमुख दावेदार आहेत. काँग्रेसने उमेदवाराची जिंकून येण्याची क्षमता विचारात घेतल्यास त्यांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. दीर्घ काळ पक्षकार्य केलेले डॉ. गुरुदास नाटेकर, विजय भिके हेसुद्धा काँग्रेसच्या उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. त्या दोघांना यापूर्वीच्या निवडणुकांत कांदोळकर यांना मिळालेल्या मतांच्या तुलनेत अर्धीसुद्धा मते मिळाली नसल्याने त्यांचा उमेदवारीबाबत विचार होण्याची शक्यता तशी कमीच वाटते. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची युती होऊन म्हापशातील जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला येईल व आपण ती निवडणूक लढवीन असे राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस संजय बर्डे यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. मगोच्या उमेदवारासाठी भारत तोरसकर व बाळू फडके यांची नावे घेतली जात असली तरी सध्या भाजपमध्ये असलेले तथा माजी नगरसेवक तुषार टोपले यांना मगो पक्षात पुन्हा आणून त्यांना उमेदवारी द्यावी असाही मतप्रवाह स्थानिक मगो कार्यकर्त्यांत आहे. ‘आप’तर्फे राहुल म्हांबरे निवडणूक लढवण्याची दाट शक्यता आहे. गोवा फॉरवर्ड व शिवसेना या पक्षांची म्हापशात सध्या आगामी निवडणुकीबाबत सामसूम दिसून येतेय.

आजवरचे आमदार

१९६३ रघुनाथ अनंत टोपले (मगो)

१९६७ गोपाळराव मयेकर (मगो)

१९७२ रघुवीर पानकर (मगो)

१९७७ सुरेंद्र सिरसाट (मगो)

१९८० श्यामसुंदर नेवगी (मगो)

१९८४ चंद्रशेखर दिवकर (मगो)

१९८९ सुरेंद्र सिरसाट (मगो)

१९९४ सुरेंद्र सिरसाट (मगो)

१९९९ फ्रान्‍सिस डिसोझा (गोवा राजीव काँग्रेस)

२००२ फ्रान्‍सिस डिसोझा (भाजप)

२००७ फ्रान्‍सिस डिसोझा (भाजप)

२०१२ फ्रान्‍सिस डिसोझा (भाजप)

२०१७ फ्रान्‍सिस डिसोझा (भाजप)

२०१९ ज्योशुआ डिसोझा (भाजप) (पोटनिवडणूक)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rashi Bhavishya 08 November 2024: तुमच्या परदेश वारीचं स्वप्न पूर्ण होणार; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

Goa Electricity: हायकोर्टाच्या 'शॉक'नंतर वीज विभागाला जाग, नवीन जोडणीसंदर्भात नियम होणार कठोर

Goa Baby Day Care Centre: नोकरदार पालकांसाठी खुशखबर! गोव्यात ९ ठिकाणी सरकारतर्फे पाळणाघर; केंद्रांची यादी, नियमावली वाचा

U19 Cooch Behar Trophy: द्विशतकी भागीदारीनं गोव्याला सतावलं, ॲरन-सिद्धार्थच्या शानदार खेळीच्या जोरावर हैदराबादनं गाठला मोठा टप्पा

Indian Super League 2024: ०-१ ने पिछाडीवर असलेल्या सामन्यात एफसी गोवाचं जबरदस्त कमबॅक, 'पंजाब'ला 'दे धक्का'

SCROLL FOR NEXT