Goa Politics: जे काम संघटनेकडून अपेक्षित होते ते मुख्यमंत्र्यांनी केले

लक्ष्मीकांत पार्सेकर : भाजपला जणू इशाराच; कार्यकर्ते पक्षाचे कार्य नेटाने पुढे नेतील
Mandrem constituency is ready to take BJP forward After visit of CM Pramod Sawant
Mandrem constituency is ready to take BJP forward After visit of CM Pramod SawantDainik Gomantak

पणजी: आपल्‍याला पक्षाने उमेदवारीत डावलले तर भाजप (BJP) मांद्रेची (Mandrem) जागा गमावेल, असा इशारा माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर (Laxmikant Parsekar) यांनी दिला आहे. स्थानिक पातळीवर वातावरण प्रतिकूल असू शकते. मात्र मला उमेदवारीसंदर्भात वर (Delhi) न्याय मिळेल, असा विश्वासही त्यांनी ‘गोमन्तक’शी बोलताना व्यक्त केला.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मांद्रे मतदारसंघाच्या दौऱ्यात पार्सेकर यांच्यासोबत भाजपशी एकनिष्ठ असलेल्यांशी संवाद साधला. त्यानंतर पार्सेकर यांनी मनोभूमिका जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, जे काम संघटनेकडून करणे अपेक्षित होते ते मुख्यमंत्र्यांनी केले. गेली अडीच वर्षे पक्षात असूनही अडगळीत टाकण्यात आलेल्या कार्यकर्त्यांच्या भावना मुख्यमंत्र्यांनी ऐकल्या. योग्य ठिकाणी त्या पोचवण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे अडीच वर्षे दुर्लक्षित राहिलेल्या कार्यकर्त्यांनी आता नेटाने पक्षाचे काम पुढे न्यायचे ठरवले आहे.

Mandrem constituency is ready to take BJP forward After visit of CM Pramod Sawant
Goa Government: म्हणून 120 कोटींचे अनुदान वीज खात्याला द्यावे लागले

मनात साचलेले निघून गेले...

कार्यकर्ते इतर पक्षाचे काम करण्याचा मनात विचारही आणणार नाहीत. पक्षाकडून आपल्याला काही हवे म्हणून ते पक्षासोबत नाहीत तर ते भाजपच्या विचारासोबत आहेत. सुरवातीला भाजपसाठी प्रतिकूल परिस्थिती असतानापासूनचे ते कार्यकर्ते आहेत. त्यांच्याही काही व्यथा आजच्या राजकीय वातावरणात होत्‍या. त्याला काल वाचा फोडता आली याचे त्यांना समाधान आहे. मनात साचलेले काल निघून गेले आणि नव्या दमाने सर्वजण भाजपचे काम पुढे नेण्यास तयार झाले आहेत, असे त्यांनी सांगितले.

Mandrem constituency is ready to take BJP forward After visit of CM Pramod Sawant
Goa Assembly Elections: चिदंबरम यांनी कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांची घेतली बैठक

काय म्हणतात पार्सेकर...

भाजपचे राज्यात जे जोमाने काम सुरू झाले त्यात मांद्रे मतदारसंघाचा समावेश होता. पक्षासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना आता मतदान केंद्र समितीवरही स्थान मिळू नये, यासारखी दुसरी वाईट गोष्ट नव्हती. मंडळ समिती, विविध मोर्चांच्या समित्या, जिल्हास्तरीय समित्या यातही त्यांना स्थान मिळू शकले नाही. काल परवापर्यंत पक्षाची धुरा स्थानिक पातळीवर वाहणाऱ्याला असे एकदम अडगळीत टाकणे चुकीचे होते. याची दखल संघटनेकडून घेणे अपेक्षित होते. मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांचे हे दुःख जाणून घेतले. यामुळे मांद्रे मतदारसंघातील नेमके राजकीय चित्रही त्‍यांना समजण्यास मदत झाली असेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com