एकदिवसीय गोवा भेटीत फडणवीस (Devendra Fadnavis) किती बंडोबांना शांत करण्यात शस्वी झाले?  Dainik Gomantak
गोवा

भाजपमधील बंडोबांना शांत करण्यात केंद्रीय नेतृत्व अयशस्वी

फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी लोबो (Michael Lobo) आणि कवळेकर यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. लोबो यांच्या निकटवर्तीयांनी दिलेल्या माहितीनुसार, कळंगुटच्या आमदाराने आपली पत्नी स्वतंत्र आहे आणि तिला निवडणुकीपासून परावृत्त करणे आपल्याला शक्य नाही.

दैनिक गोमन्तक

पणजी: भाजपचे (BJP) निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) अवघ्या काही तासांसाठी मंगळवारी गोव्यात (Goa) आले ते फायर फायटिंगसाठीच, हे आता सिद्ध झाले आहे. त्यांनी आपल्या भेटीत विश्वजीत राणे, मायकल लोबो (Michael Lobo) आणि माविन गुदिन्हो यांची प्रामुख्याने भेट घेतली. अमित शहा (Amit Shah) यांनीच त्यांना या नेत्यांची समजूत काढण्यास पाठवले. परंतु आपल्या या एकदिवसीय भेटीत फडणवीस किती यशस्वी झाले, हा प्रश्नच आहे.

सांगेत सावित्री कवळेकरांचा वरचष्मा!

सुकाणू समितीच्या सदस्याने दिलेल्या माहितीनुसार, सांगेचे आमदार प्रसाद गावकर सध्या काँग्रेसच्या वळचणीला गेल्याने त्यांचा मतदारसंघावरील प्रभाव घटला. तेथे गेली दहा वर्षे सावित्री कवळेकर या अत्यंत जोमाने काम करतात. त्या जिंकून येण्याची शक्यता भाजपला वाटते. कवळेकर, लोबो यांनी यापूर्वीच आपल्या पत्नींना अपक्ष म्हणून निवडणूक लढवू द्यावी, अशी विनंती अमित शहा यांच्याकडे केली आहे. परंतु त्यांनी नकार दिला होता. बाबू कवळेकर यांच्या निष्ठेबद्दल शहा खूष आहेत, आणि भाजपमध्येही त्यांच्याविषयी चांगले वातावरण आहे.

विश्वजीत राणे, मायकल लोबो, माविन गुदिन्हो आणि बाबू कवळेकर हे सध्या सत्ताधारी भाजपसाठी अवघड जागेचे दुखणे ठरले असून, त्यांना नाखूष करणे सध्याच्या नेतृत्वाला शक्य नाही. ‘हे नेते मूळ भाजपचे नाहीत; परंतु ते पुन्हा जिंकून येतील आणि इतर मतदारसंघांवरही प्रभाव टाकण्याइतपत ते बलवान आहेत. त्यामुळे त्यांची मनधरणी करण्यावाचून नेतृत्वाला दुसरा पर्याय नाही’, अशी प्रतिक्रिया भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने दैनिक ‘गोमन्तक’ला दिली. फडणवीस यांना भेटणाऱ्यांमध्ये कार्लुस आल्मेदा आणि दामू नाईक यांचाही समावेश होता.

विश्वजीत राणे, मायकल लोबो आणि बाबू कवळेकर यांच्या सौभाग्यवती आगामी निवडणूक लढविण्याबाबत ठाम आहेत. त्यांना परावृत्त करण्याची जबाबदारी फडणवीस यांच्यावर सोपविण्यात आली होती. विश्वजीत राणे यांना एक जादा उमेदवारी देण्याबाबत पक्षात विरोध नाही. परंतु लोबो आणि कवळेकर यांच्या पत्नींना उमेदवारी दिल्यास ती भाजपच्या अंगलट येईल, असा निष्कर्ष सध्या पक्षाच्या नेतृत्वाने काढला आहे.

फडणवीस यांनी लोबो आणि कवळेकर यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. लोबो यांच्या निकटवर्तीयांनी दिलेल्या माहितीनुसार, कळंगुटच्या आमदाराने आपली पत्नी स्वतंत्र आहे आणि तिला निवडणुकीपासून परावृत्त करणे आपल्याला शक्य नाही, असे मत फडणवीसांच्या कानावर घातले. ‘भाजपला मी सध्या नकोसा झालो आहे. माझी स्वतःची तशी मनोभूमिका बनत आहे. भाजपची हीच प्रवृत्ती राहिल्यास मी सत्ताधारी पक्षाची साथ सोडू शकतो’, अशी प्रतिक्रिया लोबो यांनी त्यांच्या एका निकटवर्तीयांकडे व्यक्त केल्याची माहिती ‘गोमन्तक’ला उपलब्ध झाली आहे. लोबो यांच्या संपर्कात तृणमूल काँग्रेस आहे. यापूर्वी आम आदमी पक्षानेही त्यांच्याशी संपर्क साधला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT