P. Chidambaram
P. Chidambaram Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly Elections: चिदंबरम यांनी कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांची घेतली बैठक

दैनिक गोमन्तक

पणजी: गोवा विधानसभेच्या निवडणूकीची (Goa Assembly Elections) व्युहरचना करण्यासाठी गोव्यात दोन दिवसाच्या दौऱ्यावर आलेले कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते व माजी केंद्रिय मंत्री पी चिदंबरम (P Chidambaram) यांनी आज पहिल्या दिवशी कॉंग्रेसचे आमदार, खासदार, माजी आमदार, माजी खासदार व प्रदेश कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यासोबत चर्चा केली. माध्यमाशी स्पष्टपणे काही न बोलताना चिदंबरम यांनी चर्चेला महत्व दिले.

दाबोळी विमानतळावर आगमन झाल्यानंतर गोवा प्रभारी दिनेश गुंडूराव (Dinesh Gundurao), विरोधीपक्षनेचे दिगंबर कामत, प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर (Girish Chodankar) आदीं नेत्यांसह कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी चिदंबरम यांचे जोरदार स्वागत केले. मात्र तेथे प्रसिध्दी माध्यामाशी बोलण्याचे चिदंबरम यानी टाळले. दोनापावला येथील इंटरनॅशनल सेंटर मध्ये दाखाल झाल्यानंतरही त्यानी पत्रकारांशी संवाद टाळत उद्या बोलू असे सांगितले.

दुपारनंतर चिदंबरम यांनी कॉंग्रेसचे आमदार, खासदार व महत्वाच्या नेत्यासोबत चर्चा केली. रात्री उशीरापर्यंत हे चर्चासत्र सुरु होते. गोव्याचे कॉंग्रेस निरीक्षक निरक्षक म्हणून चिदंबरम यांची नियुक्ती झालेली असल्याने या दोन दिवशीय भेटीत ते येत्या विधानसभा निवडणुकीबाबत अनेक महत्वाच्या विषयावर कॉंग्रेस पक्षाच्या नेत्यासोबत बैठका घेऊन चर्चा करणार आहेत. त्याचसोबत युतीबाबतही इतर पक्षाच्या नेत्याशी त्यांची चर्चा होण्याची शक्यता आहे. चिदंबरम हे काही नेत्यांशी वन टू वन भेट घेऊन येत्या विधानसभा निवडणुकीबाबत पक्षाची नक्की काय स्थिती आहे हे जाणून घेणार असल्याचे सांगण्यात आले.

40 ही मतदारसंघात कॉंग्रेस मजबूत

गोव्यातील 40 ही मतदारसंघात कॉंंग्रेस मजबूत आहे. सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळत आहे. येत्या निवडणुकीत कॉंग्रेसला मागीलवेळेपेक्षा जास्त जागा मिळणार आहेत. विद्यमान भाजप सरकारला लोक कंटाळले आहेत. राज्याचे प्रशासन कोलमडले आहे. कायदा सुव्यवस्था बिघडली आहे. चिदंबरम हे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांना अनेक निवडणुकांचा अनुभव आहे. त्यानुसार ते गोव्यातील नेत्यांशी चर्चा करुन पक्षाचे धोरण ठरवणार आहेत.

आमदार व प्रमुख नेत्याशी चर्चा करणार

गोव्याचे निवडणूक निरीक्षक म्हणन नियुक्ती झाल्यानंतर चिदंबरम यांची ही पहिलीच भेट आहे. या भेटीत ते पक्षाचे आमदार, खासदार, प्रमुख पदाधिकारी , माजी आमदार व विविध विभागांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. युतीसह इतर विषयावर गरज वाटेल तशी चर्चा ते करतील.

पहिल्या टप्प्यात युतीची चर्चा नाही

चिदंबरम हे यापुढेही गोव्यात येणार आहेत. हा त्याचा पहिला दौरा आहे. यावेळी पहिल्या टप्यात ते युतीबाबत चर्चा करणार नाहीत. तर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसोबतच विविध विभागांच्या प्रमुखांशी , जिल्हा समित्यांशी चर्चा करणार आहेत. ते अनुभवी नेते असल्याने कॉंग्रेसला त्याचा लाभ नक्कीच होईल.

त्यांना चांगले वाईट कळते

चिदंबरम हे अनुभवी नेते व शिस्तप्रिय नेते आहेत. काय चांगले व काय वाईट यांची त्यांना जाणीव आहे. आपण आपले मत त्यांच्यासमोर मांडले आहे. सर्वाशी झालेल्या चर्चेबाबत लवकरत स्पष्टता येईल.

- ॲड. रमाकांत खलप (ज्येष्ट कॉंग्रेस नेते)

मायकल लोबोना विरोध

कळंगुट मतदारसंघात मंत्री माकल लोबो यांना कॉंग्रेसची उमेदवारी देण्यास कळंगुटमधील सक्रिय कॉंग्रेस नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी तिव्र विरोध दर्शवला आहे. गेल काही दिवस लोबो हे भाजप सोडून कॉंग्रेसमध्ये जाणार असल्‍याची चर्चा आहे. या पार्श्‍वभुमीवर आज कळंगुटमधील अनेक नेते व कार्यकर्ते दोनापावला येथे आले व त्यांनी लोबो यांना कॉंग्रेसमध्ये घेण्यास आक्षेप नोंदवला. गोवा प्रभारी दिनेश गुंडूराव यांची भेट घेऊन त्यांना याबाबत सांगण्यात आले. त्यावेळी राव यांनी लोबो यांना कॉंग्रेसमध्ये घेण्यात येणार नसल्याचे आश्‍वासन दिल्याचे या कार्यकर्त्यांनी सांगितले.

तरी सुध्दा भाजपच सत्तेवर येणार

चिदंबरम गोव्यात आले तरी काही फरक पडणार नाही. ते आपल्या पक्षाचे काम करतील आणि जातील. पण गोव्यात मात्र पुन्हा भाजपचेच सरकार येणार आहे. कारण राज्यात भाजपची स्थिती मजबूत आहे. पेडणे मतदारसंघात मगो पक्षाच्या उमेदवारीवर आपण अनेक वर्षांनी निवडून आलो होतो. लोक आपल्या मागे आहेत. आपण पुन्हा निवडून येणार आहे. अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री तथा पेडणेचे आमदार बाबू आजगावकर यांनी दिली आहे. चिदंबरम गोव्यात आल्याचा भाजवर किती परिणाम होईल? असा प्रश्‍न विचारल्यानंतर आजगावकर यांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai Goa Highway Traffic: मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी; झाड कोसळल्याने खोळंबा!

Goa Success Story: गणेश SSC पास हो गया! गोव्यातील वानरमारे समाजातील ठरला पहिलाच विद्यार्थी

Goa 11th Admission: अवाजवी शुल्क आकारल्यास तात्काळ कारवाई; CM सावंत यांचा विद्यालयांना इशारा

Yellow Alert In Goa: गोव्यात यलो अलर्ट, पुढील दोन दिवस महत्वाचे

Goa Drugs Case: इवल्याशा गोव्यात ड्रग्जचा सुळसुळाट; 3.8 कोटींचे अमली पदार्थ जप्त

SCROLL FOR NEXT