Goa Politics: आमदार आल्मेदा दोन वेळा निवडून आले मात्र वास्कोचा विकास ' शून्य '

कदंब बसस्थानकावरील (Vasco KTC) खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून नागरिकांची घोषणाबाजी (Goa Politics)
आमदार कार्लोस आलमेडा यांचे विरोधात वास्को बस स्थानकावरील खड्ड्यांत रोपे लाऊन मोर्चा (Goa Politics)
आमदार कार्लोस आलमेडा यांचे विरोधात वास्को बस स्थानकावरील खड्ड्यांत रोपे लाऊन मोर्चा (Goa Politics) Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Politics: सुमारे २०० हून अधिक रहिवाशांनी वास्को कदंब बस स्थानकावर मोर्चा (Morcha at Vasco KTC) काढून कदंब बसस्थानकावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून आमदार कार्लुस आल्मेदा (MLA Carlos Almeida) यांच्या अपयशावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यात युवकांचा अधिक भरणा होता. वास्कोतील विकास कामांना खीळ बसली असून अनेक मुख्य प्रकल्प अजून लालफितीत आहेत. यात मुख्य म्हणजे वास्कोतील कदंब बस स्थानकाचा विकास अजून होत नाही.

वास्कोचे आमदार कार्लुस आल्मेदा स्थानिक आमदार असूनही तसेच कदंब महामंडळाचे चेअरमन (Chairman of Vasco KTC) असूनही या कदंब बसस्थानकाचे काम हाती घेण्यात अपयशी ठरले आहे. असा ठपका ठेवत आज वास्कोतील सुमारे २०० हून अधिक रहिवाशांनी हातात फलक घेऊन तसेच आमदार आल्मेदा यांच्या विरोधात घोषणा देत (Proclamation against MLA of Vasco) मोर्चा काढला व कदंब बसस्थानकावर धडक देऊन आमदार आल्मेदा यांच्या या अपयशावर नाराजी व्यक्त केली.

आमदार कार्लोस आलमेडा यांचे विरोधात वास्को बस स्थानकावरील खड्ड्यांत रोपे लाऊन मोर्चा (Goa Politics)
Goa Mining Scam: दहा वर्षे भाजप सरकार गप्प का बसले?

कदंब बसस्थानकाचे फायलींचे काम वगळता काडी भरही काम झाले नाही

आज सकाळी ९ वाजता वास्को मुंडवेल येथील संपूर्ण कदंब बसस्थानकावर रहिवाशांनी जमून या स्थानकावर पडलेल्या खड्ड्यांत रोपे (Plantation in pit at Vasco Bus Station) लावली व बकाल झालेल्या कदंब बसस्थानकाविषयी नाराजी व्यक्त केली. यात जास्त युवक - युवतींचा समावेश हा मोठ्या प्रमाणात होता.

या मोर्चाचे प्रतिनिधित्व केलेले सिद्धार्थ कासकर यांनी बोलताना वास्कोतील कदंब बस स्थानकाचे फायलिंगचे काम दाखवण्या पलीकडे आमदार कार्लुस आल्मेदा यांनी काहीच केले नाही. पाच वर्षापूर्वी कदब बस स्थानकाच्या नवीन बांधकामाची पायाभरणी घालण्यात आली होती. मात्र फायलींचे काम वगळता अजून काडी भरही काम झाले नसल्याचे ते म्हणाले. विकास कामाच्या नावाखाली ही लोकांच्या डोळ्यात धूळफेक असल्याचे कासकर यांनी सांगितले.

आमदार कार्लोस आलमेडा यांचे विरोधात वास्को बस स्थानकावरील खड्ड्यांत रोपे लाऊन मोर्चा (Goa Politics)
Goa CM: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत गुरुवारी मयेमध्ये...

आम्हाला विकास करणारा आमदार हवा आहे

वास्कोचे आमदार कार्लुस आल्मेदा दोन वेळा निवडून आले मात्र आजपर्यंत ते वास्कोचा विकास करण्यात असमर्थ ठरले. आम्हाला आशा होती की दोन वेळा निवडून आले म्हणजे वास्कोचा विकास नाक्कीच होणार पण तसे काही झाले नाही. तेव्हा आम्हाला या वेळेस विकास करणारा आमदार हवा आहे. आमदार आल्मेदा यांच्या कार्यकाळात वास्कोचा विकास शून्य असल्याचे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Food Court In Darkness
TCP Act Section 39A Goa
Double Engine Government Goa
Goa Job Scam
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com