Mahua Moitra

 
Dainik Gomantak
गोवा

'भाजपचा पराभव करा, ममताच ठरवणार मुख्यमंत्री'

युतीचे भागीदार असलेल्या मगोच्या नेत्यांना विश्वासात घेऊनच हा निर्णय घेतला जाईल

दैनिक गोमन्तक

मडगाव : काँग्रेस सोडून तृणमूल पक्षात सामील झालेले कुडतरीचे माजी आमदार तृणमूलचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून लोकांपुढे आणणार, असे या आधी सांगितले जात होते. मात्र, आमचा अजूनही मुख्यमंत्री पदाचा उमेदवार ठरलेला नाही, असे तृणमूलच्या गोवा प्रभारी महुआ मोईत्रा यांनी स्पष्ट केले. गोव्यातील (goa) मुख्यमंत्री पदाचा उमेदवार ममता बॅनर्जीच (Mamata Banerjee) ठरवतील, असे त्या म्हणाल्या.

मंगळवारी कुडतरी येथे लॉरेन्स यांच्या घरी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हा खुलासा केला. युतीचे भागीदार असलेल्या मगोच्या नेत्यांना विश्वासात घेऊनच हा निर्णय घेतला जाईल, असे त्या म्हणाल्या. यावेळी तृणमूलच्या राज्यसभा खासदार सुश्मिता देव याही उपस्थित होत्या.

आपल्या घरच्या मतदारसंघात प्रसारमाध्यमांना संबोधित करताना रेजिनाल्ड यांनी पुनरुच्चार केला की, काँग्रेसला (Congress) सोडून तृणमूलमध्ये सामील होण्याचा आपला निर्णय भाजपला पराभूत करण्याच्या इराद्याने झाला आहे. मी माझ्या लोकांच्या हितासाठी तृणमूलमध्ये (Trinamool) सामील झालो आहे. कारण ते एका चांगल्या भविष्यासाठी मार्ग मोकळा करेल, ज्यामध्ये काँग्रेसला रस नाही. भाजपशी (BJP) लढण्याचा केवळ तृणमूलचा हेतू आहे आणि मला विश्वास आहे की माझे लोक यात माझ्या पाठीशी उभे राहतील, असे रेजिनाल्ड म्हणाले.

रेजिनाल्ड यांच्या धैर्याचे कौतुक

रेजिनाल्डच्या जिद्दीचे कौतुक करताना महुआ मोईत्रा (Mahua Moitra) यांनी सांगितले की, कुडतरीच्या लोकांनी रेजिनाल्ड यांना तृणमूलसाठी नाही तर गोव्याच्या भविष्यासाठी दिले आहे. योग्य मार्ग आणि योग्य चळवळीत सामील झाल्याबद्दल त्यांच्या धैर्याबद्दल मी त्यांचे कौतुक करते. आज हा लढा फक्त कुडतरीच्या लोकांचा नाही तर भारतातील लोकांचा आहे. हा असा लढा आहे जो केवळ राजकीय लढा नाही, तर एक नैतिक लढा आहे, सांस्कृतिक लढा आहे, अगदी आध्यात्मिक लढासुद्धा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT