Goa Elections: रेजिनाल्ड यांनी रामराम ठोकूनही काँग्रेस उमेदवाराचा वाद कायम

कुडतरीतील माजी आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी कॉंग्रेसला रामराम ठोकून आठवडा उलटत असला तरी एकेकाळी बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात कुणाला उमेदवारी ते अजून कॉंग्रेसमध्ये (Congress) ठरलेले नाही.
Alex Reginald Lawrence

Alex Reginald Lawrence

Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Elections: कुडतरीतील माजी आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी कॉंग्रेसला रामराम ठोकून आठवडा उलटत असला तरी एकेकाळी बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात कुणाला उमेदवारी ते अजून कॉंग्रेसमध्ये (Congress) ठरलेले नाही. रेजिनाल्ड (Alex Reginald Lawrence) यांच्याविरुद्ध जनमत तयार करण्यासाठी एक जाहीर सभा आयोजित करण्याचे पक्षामध्ये शिजत असतानाच ज्येष्ठ नेते व राशोलचे माजी सरपंच असलेले जोजेफ वाज यांनी पक्षाने फॅमिली राज टाळावे व उमेदवारीसाठी पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्याचाच विचार करावा असे सुचविले आहे.

<div class="paragraphs"><p>Alex Reginald Lawrence</p></div>
नववर्षाच्या स्वागतासाठी किनारे गजबजले, नियम धाब्यावर

यासंदर्भात त्यांनी पक्षनेत्यांना एक निवेदन सादर केले असून, त्यात स्वकेंद्रीत तसेच हुकूमशाही प्रवृत्ती असलेली व्यक्ती तसेच गुन्हेगारी पार्श्र्वभूमी असलेल्यांना दूर ठेवावे, असे सांगतानाच पक्षात काही स्वार्थी व्यक्ती कार्यरत आहेत, पण उमेदवार निवडताना अशांच्या दडपणाला बळी पडू नये, असे ते म्हणाले.

'आजवरचा अनुभव बस्स झाला. आता सांगोपांग विचार करण्याची वेळ येऊन ठेपलेली आहे. आता प्रामाणिक, भरवशाच्या, जो सदैव लोकांबरोबर राहील, पक्षनेतृत्वाचा आदर करेल अशा व्यक्तीचीच उमेदवार म्हणून निवड होणे गरजेचे आहे', असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. विविध गावांना रोटेशन तत्त्वावर हे प्रतिनिधीत्व द्या त्यामुळे केरळ धर्तीवर सर्व गावांना प्रतिनिधीत्व मिळू शकेल, असे म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com