<div class="paragraphs"><p>Goa Assembly Election </p></div>

Goa Assembly Election

 

Dainik Gomantak

गोवा

ॲन्थोनी बार्बोजाला भाजपतर्फे उमेदवारीची शक्यता!

दैनिक गोमन्तक

सासष्टी: भारतीय जनता पक्षातर्फे त्यांचे अनुसूचित जमातीचे नेते ॲन्थोनी बार्बोजा यांना आगामी विधानसभा निवडणुकीत (Goa Assembly Election) कुडतरी मतदारसंघातून उमेदवारी देण्याची शक्यता बळावलेली आहे.

एका महिन्यापूर्वी कॉंग्रेसचे (Congress) नेते मोरेनो रेबेलो यांनी भाजपात (BJP) प्रवेश केला होता तेव्हा मोरेनोलाच उमेदवारी मिळणार हे ठरले होते. त्यामुळे गेल्या एक ते दीड वर्षांत कुडतरी मतदारसंघात अनेक उपक्रमाद्वारे व विविध कार्यक्रम आयोजित करून उमेदवारीची शक्यता वाढवलेल्या ॲन्थोनी बार्बोजा यांच्या समर्थकांमध्ये नाराजी पसरली होती.

ॲन्थोनीने आपल्या वाढदिनी आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत ( Pramod Sawant) यांनी हजेरीही लावून ॲन्थोनीची उमेदवारी निश्र्चित झाल्याचे दाखवून दिले होते. पण, कॉंग्रेसचे नेते व उमेदवारी दिलेले माजी आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्सोला उमेदवारी मिळणार म्हणून पक्ष सो़डून मोरेनोने भाजपात प्रवेश केला होता. पण रेजिनाल्डच कॉंग्रेस पक्ष सोडून तृणमूलमध्ये गेल्याने मोरेनो यांनी घरवापसी केली, ती केवळ कॉंग्रेस उमेदवारीच्या आशेने.

मोरेनो कॉंग्रेसमध्ये परतल्याने कुडतरीत भाजपसाठी उमेदवारी देण्यासाठी अनेक पर्याय खुले झाले आहेत. मात्र, खासदार फ्रान्सिस सार्दिन यांनी आपले पुत्र शेलॉमसाठी कॉंग्रेस उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्न सुरू केल्याने कॉंग्रेसमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lairai Jatra: लईराई देवीचा जत्रोत्सव भक्तिमय वातावरणात साजरा; भाविकांचा लोटला महापूर

Netravali: कदंबच्या 'त्या' कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करणार : वनमंत्री राणे

Yellow Alert In Goa: गोव्यात दोन दिवस यलो अलर्ट, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

Mukesh Ambani: मुकेश अंबानी लवकरच करणार 150 अब्ज डॉलर्सच्या मार्केटमध्ये एन्ट्री? ‘या’ क्षेत्रात आजमावणार हात

गोव्यात लवकरच AI द्वारे होणार फुफ्फुसाच्या कर्करोगाची तपासणी, आरोग्य मंत्र्यांची माहिती

SCROLL FOR NEXT