..म्हणूनच, केंद्र सरकारने 'कायद्यात' दुरुस्ती केली

भाजपकडून अल्पसंख्यांकावर हल्ले: गिरीश चोडणकर
Goa Politics Girish Chodankar

Goa Politics Girish Chodankar

Dainik Gomantak

पणजी (Goa Politics) : भाजप सरकार मिशनरीज ऑफ चॅरिटीचा अर्ज नाकारून त्यांना काम करण्यापासून परावृत्त करत आहे व आपल्या इतर भगव्या संघटनांचा आधार घेवून अल्पसंख्याकांवर हल्ले करत आहेत. संघटनांना संतुष्ट करण्यासाठीच केंद्र सरकारने कायद्यात दुरुस्ती केल्याचा आरोप गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी आज केला.

<div class="paragraphs"><p>Goa Politics Girish Chodankar</p></div>
भाजपशी कधीच गद्दारी करणार नाही

पणजीतील काँग्रेस (Congress) कार्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेला काँग्रेस नेते तुलिओ डिसोझा व एनएसयूआय गोवा विभागाचे अध्यक्ष नौशाद चौधरी उपस्थित होते. अल्पसंख्यांकावर होत असलेल्या अन्याया बद्दल बोलताना भाजपवर टिकास्त्र सोडताना गिरीश चोडणकर (Girish Chodankar) म्हणाले की, पात्रता अटींची पूर्तता केली नसल्याच्या बहाण्याने मिशनरीज ऑफ चॅरिटीच्या फॉरेन कॉन्ट्रिब्युशन (रेग्युलेशन) कायद्याखाली नोंदणीच्या नूतनीकरणासाठी अर्ज नाकारण्याच्या केंद्र सरकारच्या कृतीचा निषेध करण्यात येत आहे.

<div class="paragraphs"><p>Goa Politics Girish Chodankar</p></div>
बाबू आजगावकर यांना भाजपची उमेदवारी मिळण्याची शक्यता अंधूक

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या आशीर्वादाने अल्पसंख्याकांना लक्ष्य करणे आणि त्यांच्यावर हल्ले करणे सुरू आहे. भाजप सरकार सत्तेत आल्यापासून अल्पसंख्याकांना लक्ष्य केले जात आहे, जे घडलेल्या अनेक घटनांवरून दिसून येते. देशात ज्या राज्यामध्ये भाजप सरकार आहे त्या ठिकाणी असे प्रकार घडत आहेत. यावेळी नाताळ सणही साजरा करण्यास अल्पसंख्यांकांना अटकाव केला. भाजप सरकार एनजीओच्या कामातही अडथळे निर्माण करत आहे. भाजप हे राजकीय लाभ मिळवण्यासाठी आणि सत्ता काबीज करण्यासाठी करत आहे, अशी टीका चोडणकर यांनी केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com