Goa Assembly Election 2022 Dainik Gomantak
गोवा

येत्या 2 दिवसात गोवा विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजण्याची शक्यता

अर्ज भरताना उमेदवाराच्या बरोबर आणि घरोघरी जाऊन प्रचारावेळीही प्रत्येकी फक्त पाच कार्यकर्तेच बरोबर जातील.

दैनिक गोमन्तक

पणजी: गोव्यासह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या कार्यक्रमाची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगातर्फे येत्या दोन-तीन दिवसांत होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली. कोरोनाची तिसरी लाट आली असली तरी निवडणुका वेळेतच घ्याव्यात असा आग्रह सर्व पक्षांनी आयोगाकडे धरला होता. तो मान्य करतानाच जास्तीत जास्त व्हर्च्युअल प्रचार सभांवर भर द्या असा आग्रह आयोग धरेल असे दिसते. (Goa Assembly Election Dates To Be Declared Soon)

कार्यक्रम जाहीर करण्यापूर्वी केंद्रीय आरोग्य आरोग्य मंत्रालय व राज्यांच्या संस्थांबरोबरील आयोगाच्या चर्चेची प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. त्यामुळे आता निवडणुका (Election) जाहीर होण्याकडे नेत्यांचे लक्ष लागले आहे. तारखांची घोषणा करण्यासाठी शनिवार- रविवारची सरकारी सुट्टी वगैरेचा विचार आयोग करत नाही हे अनेकदा दिसले आहे. त्यानुसार रविवारी (ता.9) किंवा सोमवारी (ता. 10) घोषणा होईल असे सूत्रांनी सांगितले.

आयोगाने विविध संस्थांबरोबर पाचही राज्यातील परिस्थितीची विशेषतः कोरोना (Coronavirus) नियंत्रणाबाबत चर्चा केली. निवडणुका जास्तीत जास्त सुरक्षित वातावरणात पार पडाव्यात याचा आग्रह आयोगाने धरला आहे. त्यादृष्टीने सध्याची रूग्णसंख्या, लसीकरण (Vaccination) झालेले नागरिक, लसीकरणाचा वेग आदींबाबत आरोग्य मंत्रालय, आयसीएमआर व एम्सचे संचालक यांच्याशी दीर्घ चर्चा झाली. त्याचप्रमाणे सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टीने गृह मंत्रालय व निमलष्करी दलांच्या अधिकाऱ्यांशीही चर्चा झाली. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची सुसज्जता, अचानक बिघाड झाल्यास पर्यायी व्यवस्था आदींचाही आढावा आयोगाने घेतला. निवडणूक कामावर येणारे लाखो अधिकारी-कर्मचारी, पोलिस व सुरक्षा दलांचे जवान यांचे दोन्ही डोसचे लसीकरण पूर्ण झालेले असणे बंधनकारक असेल.

अर्ज भरताना पाचच कार्यकर्ते

अर्ज भरताना उमेदवाराच्या बरोबर आणि घरोघरी जाऊन प्रचारावेळीही प्रत्येकी फक्त पाच कार्यकर्तेच बरोबर जातील. मैदानाची क्षमता 10 हजारांची असेल तर तेथील सभेत 1000-2000 लोकांनाच प्रवेश द्यावा, सहा फूट अंतर आणि मास्कची सक्ती या अटींचे पालन करण्यात यावे, डोस घेतलेल्यांनाच सभेसाठी प्रत्यक्ष जाण्याची अनुमती द्यावी आदी सूचना आयोग करेल. प्रत्येक निवडणूक केंद्रावर सॅनिटायजर असणे सक्तीचे असेल. एका केंद्रावर 1500 ऐवजी 1250 मतदारांच्याच मतदानाची व्यवस्था होणार आहे. त्यादृष्टीने मतदान केंद्रांची संख्या वाढविण्याचा निर्णय यापूर्वीच झाला आहे. त्याच्या अंमलबजावणीला लवकरच सुरवात होईल.

मतदानाच्या वेळी ओमिक्रॉन अत्युच्च पातळीवर असेल. त्यावेळी मतदार बाहेर येणेही कठीण होणार. निवडणूक आयोगाने योग्य तो निर्णय घेण्याची गरज आहे.

- विजय सरदेसाई, अध्यक्ष, गोवा फॉरवर्ड

कोरोनाच्या परिस्थितीत मतदारांच्या आरोग्याच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याची गरज आहेच. मात्र, अशा परिस्थितीत निवडणूक घ्यायची की नाही हा निर्णय निवडणूक आयोगाने घ्यायचा आहे.

- दिगंबर कामत, विरोधी पक्षनेते

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kendra Drishti Yog 2026: शुक्र-गुरुची गट्टी जमणार, पैसा आणि प्रेम दोन्ही मिळणार! केंद्र दृष्टी योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान

RO Water: आर.ओ.चं पाणी खरंच आरोग्यासाठी घातक? तज्ज्ञ डॉक्टरांनी स्पष्टच सांगितलं; अफवांवर विश्वास ठेवण्यापूर्वी जाणून घ्या

Budh Margi 2026: "तुमची स्वप्ने होणार पूर्ण, बुध ग्रहाचा मेगा धमाका'' 21 मार्चपासून 'या' 7 राशींच्या नशिबात मोठा राजयोग

High Court: 'रागाच्या भरात मुलगी बापावर बलात्काराचा आरोप कधीच करणार नाही', जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवताना हायकोर्टाने ओढले ताशेरे; काय नेमकं प्रकरण?

डोळ्यांत पाणी अन् हृदयात धडधड... कुवेतमध्ये अडकलेल्या उर्वशी रौतेलाला विमानातचं कोसळलं रडू; युद्धजन्य स्थितीतील मांडली व्यथा VIDEO

SCROLL FOR NEXT