कर्नाटक सरकारने (Karnataka Government) गोव्यातून (Goa) येणाऱ्या प्रवाशांसाठी नवी नियमावली जाहीर केली आहे. गोवा राज्यातून येणाऱ्या प्रवाशांना बेळगावात (Belgaum) प्रवेश करण्यापूर्वी कोरोना निगेटिव्ह चाचणीचा RT-PCR अहवाल सादर करावा लागणार आहे. गोव्यात देखील काल कोरोना संसर्गाचे (Covid-19) प्रमाण वाढले असल्याने तसेच कर्नाटकातून गोव्यात ये-जा करणाऱ्यांची संख्याही जास्त असल्याने सुधारित आदेश जारी करत गोव्यातून कर्नाटकात प्रवेश करणाऱ्याना कोविड तपासणी अहवालाची सक्ती करण्यात आली आहे. रस्ते, विमान आणि रेल्वेमार्गाने येणाऱ्या सर्व नागरिकांना ही सक्ती असणार आहे. कर्नाटक राज्य आरोग्य खात्याने याबाबतचा आदेश बजावला आहे.
खानापूर तहसीलदार प्रवीण जैन यांनी पोलिस आणि आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांनी या आदेशाचे पालन करण्याचे आदेश दिले आहे. गोव्याला (Goa) जोडणारा कणकुंबी, हेम्माडगा आणि लोंढा या तिन्ही मार्गांवर आता 24 तास पोलिस व आरोग्य कर्मचाऱ्यांची देखरेख असणार आहे. लसिचे दोन्ही डोस आणि आरटीपीसीआर निगेटिव्ह अहवाल असलेल्यांनाच बेळगाव तालुक्यात प्रवेश दिला जावा, अशी सूचना आरोग्य अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना केली.
कर्नाटकमध्ये प्रवेश करताना दोन डोस व आरटीपीसीआर बंधनकारक केल्याने कारवार जिल्ह्यातील माजाळी व अनमोड चेकनाक्यावर तपासणी सुरू झाली आहे. अनमोड येथे अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे वाहनधारकांची फजिती झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.