Nitin Gadkari Dainik Gomantak
गोवा

Nitin Gadkari In Goa: ''साखर बघितली तर चमचे आपोआप येतात...''; गोव्यात बोलताना नितीन गडकरी असं का म्हणाले?

Goa Assembly Election 2027: 'गोव्यात भारतीय जनता पक्ष पुन्हा येईल...' होय, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.

Manish Jadhav

'गोव्यात पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाचे येईल...' होय, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे. गडकरी सध्या गोव्याच्या दौऱ्यावर आहेत. कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला गडकरी संबोधित करत होते.

यावेळी त्यांनी 2027 मध्ये होणाऱ्या विधानसभा निडणुकीसाठी (Election) तयारीला लागण्याचीही कार्यकर्त्यांना सूचना केली. गोव्यात गेल्या 15 वर्षात अभूतपूर्व काम झाले आहे.

तर येणाऱ्या काळातही गोव्याला नवी उंची प्राप्त करुन देण्यासाठी आपल्याला काम करायचे आहे, असे गडकरी म्हणाले.

गडकरी यांनी आपल्या भाषणादरम्यान दिलेल्या उदाहरणाने उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. ते म्हणाले की, तुम्हाला चहा किंवा कॉफी प्यायची असेल तर साखर टाकावी लागते जोपर्यंत साखर टाकत नाही तोपर्यंत चमचा धावून येत नाही...

गडकरी म्हणाले की, राज्यात आपले पक्ष संघटन मजबूत आहे, पण ते आणखी मजबूत करण्यासाठी आपल्याला काम करायचे आहे. निवडणुकीपूर्वीच्या दोन वर्षांमध्ये आपण एक सर्व्हे केला पाहिजे, ज्यामध्ये जनतेच्या मनामध्ये आपण काय चांगलं केलं ते शोधून काढले पाहिजे.

या साऱ्या काळात जनतेची नाराजी कोणत्या कारणांसाठी आहे हेही शोधले पाहिजे. जे आपल्या समर्थनार्थ आहेत त्यांचा विश्वास मजबूत करुन जे नाराज आहेत त्यांची नाराजी दूर करुन त्यांचा विश्वास पुन्हा एकदा संपादित केला पाहिजे. हे केलं तरच नक्की 2027 मध्ये पुन्हा एकदा गोव्यात (Goa) भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थापन होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT