Nitin Gadkari In Goa: ...तर 2027 मध्ये पुन्हा भाजप सरकार? गडकरींनी CM सावंतांना दिले महत्वाचे काम

Goa Assembly Election 2027: गोव्यात 2027 मध्ये विधानसभा निवडणुक होणार आहे. यासाठी भारतीय जनता पक्षाने आतापासूनच तयारी सुरु केली आहे.
Nitin Gadkari In Goa:...तर 2027 मध्ये पुन्हा भाजप सरकार? गडकरींनी CM सावंतांना दिले महत्वाचे काम
Nitin Gadkari In GoaDainik Gomantak
Published on
Updated on

गोव्यात 2027 मध्ये विधानसभा निवडणुक होणार आहे. यासाठी भारतीय जनता पक्षाने आतापासूनच तयारी सुरु केली आहे. गोव्यात पुन्हा एकदा भारतीय पक्षाचे सरकार स्थापन करण्यासाठी रणनिती आखण्यास सुरुवात झाली आहे.

गेल्या 15 वर्षात गोव्यात अभूतपूर्व काम झाले आहे. याच कामाच्या जोरावर पुन्हा एकदा आपण गोव्यात सत्ता स्थापन करण्यात यशस्वी होऊ असा विश्वास यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या भाषणादरम्यान व्यक्त केला.

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी सध्या गोवा दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी गोव्यासाठी विकासकामांच्या अनेक घोषणा केल्या.

गडकरी आपल्या भाषणात म्हणाले की, गोव्यात पुन्हा एकदा सरकार स्थापन करायचे असेल तर आपल्याला सर्वांना एकत्र येऊन काम करावे लागेल. विकासकामांचा अजेंडा जनतेसमोर मांडावा लागेल. त्याचबरोबर जनतेसाठी आपलं दायित्वही सिद्ध करावे लागले.

गेल्या 15 वर्षात भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील सरकारने (Government) गोव्यात अभूतपूर्व काम झालं आहे. पण येणारा दोन वर्षांचा काळ आपल्यासाठी कठीण परिक्षेचा आहे.

आपल्याला या परिक्षेत उत्तीर्ण होऊन पुन्हा एकदा गोव्यातील जनतेची सेवा करायची आहे. त्यामुळे आतापासूनच आपण कामाला लागले पाहिजे.

Nitin Gadkari In Goa:...तर 2027 मध्ये पुन्हा भाजप सरकार? गडकरींनी CM सावंतांना दिले महत्वाचे काम
Nitin Gadkari: निर्यातभिमुख धोरण स्वीकारल्याने रोजगाराच्या अनेक संधी - गडकरी

गडकरी पुढे मुख्यमंत्र्यांना सूचना करत म्हणाले की, गेल्या 15 वर्षातील गोव्यासाठीच्या व्हिजनचा अभ्यास आपण पुन्हा एकदा केला पाहिजे. त्याचबरोबर येणाऱ्या काळात आपल्याला कोणती कामे करावी लागतील याचाही विचार केला पाहिजे.

याशिवाय, निवडणुकीपूर्वीच्या (Election) दोन वर्षांमध्ये आपण एक सर्व्हे केला पाहिजे, ज्यामध्ये जनतेच्या मनामध्ये आपण काय चांगलं केलं ते शोधून काढले पाहिजे. या साऱ्या काळात जनतेची नाराजी कोणत्या कारणांसाठी आहे हेही शोधले पाहिजे.

जे आपल्या समर्थनार्थ आहेत त्यांचा विश्वास मजबूत करुन जे नाराज आहेत त्यांची नाराजी दूर करुन त्यांचा विश्वास पुन्हा एकदा संपादित केला पाहिजे. हे केलं तर नक्की 2027 मध्ये पुन्हा एकदा गोव्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थापन होईल.

Nitin Gadkari In Goa:...तर 2027 मध्ये पुन्हा भाजप सरकार? गडकरींनी CM सावंतांना दिले महत्वाचे काम
Nitin Gadkari: गोव्यात करायला कामच शिल्लक राहणार नाही; केंद्रीय मंत्री गडकरींनी गोव्यासाठी केल्या 'या' महत्वाच्या घोषणा

गडकरी पुढे संघटनेबाबत बोलताना म्हणाले की, गोव्यात आपली संघटना मजबूत आहे. पण आता ही संघटना आणखी मजबूत करण्यासाठी आपण सर्वांनी काम केले पाहिजे. गावपातळीवरील कार्यकर्त्यांपासून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत आपण आपली संघटना आणखी कशी मजबूत करु शकतो हेही पाहिजे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com