Goa Assembly Election 2022 Dainik Gomantak
गोवा

व्हॅलेंटाईन डे ठरणार गोव्यातील जनतेसाठी प्रॉमिस डे

दैनिक गोमन्तक

गोवा: विधानसभा निवडणुका अवघ्या काही तासांवर येऊन ठेपल्या आहेत, यातच निवडणूक आयोगाने घातलेल्या निर्बंधानुसार काल म्हणजेच 12 फेब्रुवारी संध्याकाळी 6 ते 14 फेब्रुवारी संध्याकाळी 6 पर्यंत प्रचार बंदी करण्यात आली आहे. यंदाची गोवा विधानसभा निवडणूक हा पूर्ण देशभर चर्चेचा विषय ठरला कारण, मागील काही महिन्यात अनेक नेत्यांनी तसेच, अनेक आमदारांनी पक्षांतर केले होते. (Goa Assembly Election 2022: Valentines Day will be Promise Day for people of Goa)

पक्षांतर करण्यामध्ये काँग्रेस (Goa Congress) नेते जास्त आहेत, काही नेते आपला पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात गेले आणि काही दिवसात माघारी आपल्या पक्षात परत आले, असे काहीसं वातावरण मागील काही दिवस राज्यात सुरू होत. मात्र राज्यात सत्ता स्थापन होईपर्यंत येथील राजकीय वातावरण ठाम पणे सांगता येत नाही. एकंदरीत आत्तापर्यंतचा पक्षांतराचे राजकारण बघता गोव्यातील जनतेला आता नेत्यांकडून व्हॅलेंटाईन डे दिवशी वचन हवे आहे की, त्या राजकीय पक्षाशी त्या नेत्याने एकनिष्ठ राहावे. अशी मागणी स्थानिक जनतेकडून होत आहे.

व्हॅलेंटाईन डे ठरणार गोव्यातील जनतेसाठी प्रॉमिस डे

14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे रोजी गोव्याच्या विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत, राज्यात भाजप विरुद्ध काँग्रेस ही जरी प्रमुख लढत असली तरीही आम आदमी आणि टीएमसी या पक्षामुळेच गोव्याच्या निवडणुकीला (Goa Assembly Election) खरी रंगत आली आहे. गोवा विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातून मोठी ताकद वापरण्यात आली होती कोविडच्या निर्बंधांमुळे घरोघरी प्रचार करण्यात आला होता. प्रत्येक उमेदवार हा घरोघरी जाऊन प्रचार करत होता. राज्यात प्रचार सभेवर मोठ्या प्रमाणात मर्यादा होत्या. या मोठ्या पक्षांसोबतच राज्यातील स्थानिक पक्ष पक्षाची भूमिका ही लक्षणीय ठरणार आहे. व्हॅलेंटाईन डे दिवशी गोव्यातील जनता कोण कोणत्या पक्षाच्या पारड्यात झुकत माप देणार, हे पाहणे लक्षणीय ठरणार आहे. मागील दोन दिवसात राज्यात परिस्थिती चिघळली बघायला मिळाली आसून भाजपसाठी (Goa BJP) निवडणूक अवघड होत असून काँग्रेससाठी सोपी ठरत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

Goa Today's News Live: बेपत्ता सुभाष वेलिंगकरांचा अटकपूर्व जामीन अर्ज!

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

SCROLL FOR NEXT