गोव्यात काही पक्ष डिपॉजिट जप्त करून घेण्यासाठी निवडणूक लढवत आहेत: फडणवीस

ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे विरोधकांवर बोचरी टीका केली.
Devendra Fadnavis and Aditya Thackeray
Devendra Fadnavis and Aditya Thackeray Dainik Gomantak

पणजी: गोवा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी मागील आठवड्यात गोवा दौरा केला. दौऱ्यादरम्यान, त्यांनी वास्को (Vasco), पेडणे (Pernem), साखळी (Sanquelim) येथे पक्षाचा प्रचार केला तसेच शिवसेनाचा जाहीरनामा देखील प्रसिद्ध केला. (BJP Shiv Sena Goa)

Devendra Fadnavis and Aditya Thackeray
Goa Election: गोव्यात 'विशेष सोशल मीडिया नियंत्रण कक्ष' स्थापन

दरम्यान, पत्रकारांशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, गोव्यात शिवसेना म्हणजे काय आहे हे, जनतेला समजायला लागले आहे. गोव्यातल्या भूमिपुत्रांना न्याय कसा द्यायचा हे शिवसेनेकडून समजून घेतले पाहिजे. आम्ही महाराष्ट्रामध्ये (Maharashtra) केलेले काम वाखाणण्याजोगे आहे.

यावेळेस ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे विरोधकांवर बोचरी टीका केली. ते म्हणाले, गोव्यात शिवसेनेने (Shiv Sena) निवडणूक लढवल्याने मतांचे विभाजन होईल. शिवसेनेच्या उमेदवारांचे डिपॉजिट जप्त होईल, असे असेल तर टीकाकार आमच्याबद्दल चर्चा का करतात? ते आम्हाला महत्व देतात कारण त्यांना माहिती आहे की गोवाच्या राजकारणात शिवसेनेचे भक्कम स्थान आहे.

Devendra Fadnavis and Aditya Thackeray
'तो' व्हिडिओ बनावट! गोवा कॉंग्रेसचा दावा

ठाकरे पुढे म्हणाले, आता आम्ही प्रत्येक निवडणूक लढणार नाही तर जिंकणार, तुमचा विश्वास दृढ करणार, आपण येथे प्रचारासाठी नाहीतर तुमच्या आशीर्वाद घ्यायला आलो कारण आम्हाला नवा गोवा बघायचा आहे.

आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या वक्तव्यावर भाजप गोवा निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. गोव्यात काही पक्ष आपले डिपॉजिट जप्त करून घेण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत, असे म्हणत फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांना टोला लगावला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com